Breaking: गँगस्टर राजकारणी अतिक अहमदच्या खूना संदर्भात सलमान खानच कनेक्शन
गँगस्टरहून राजकारणी बनलेल्या अतिक अहमदला दोन दिवसांपूर्वी काही गुन्हेगारांनी गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. पण आता याच मारेकऱ्यांबाबत काही महत्वाचे खुलासे झाले आहेत.
चौकशीदरम्यान, सनी सिंह, अरुण मौर्य आणि लवलेश तिवारी या तीनही हल्लेखोरांनी पोलिसांना सांगितलं की, ते लॉरेन्श बिश्नोईचे फॅन आहेत ज्यानं पंजाबी रॅपर आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याची गेल्यावर्षी मे महिन्यात गोळ्या घालून हत्या केली होती. याच बिश्नोईनं बॉलिवूड अभिनेता सलमान खानला देखील अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे.ज्या तीन तरुणांचं अभिनेता सलमान खानच्या धमकी प्रकरणाशी कनेक्शन समोर आलं आहे.
याप्रकरणी बिश्नोईवर वेगळे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. बिश्नोई सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. अतिकच्या या मारेकऱ्यांनी पुढे असंही सांगितलंय की, त्यांनी यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखती अनेक वेळा पाहिल्या आहेत.
फेमस होण्यासाठी केलं कृत्य
अतिकच्या हत्येनंतर तिघा मारेकऱ्यांविरोधात एफआयआर दाखल झाला. यामध्ये काही महत्वाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, तिनही मारेकऱ्यांना गँगस्टर अतिक अहमद त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांना गोळ्या घालून त्यांना प्रसिद्ध व्हायचं होतं, मोठं गँगस्टर व्हायच्या इच्छेनं त्यांनी हे कृत्य केलं. कारण गुन्हेगारीच्या जगतात काहीतरी बडं करण्यासाठी त्यांनी हे हत्याकांड घडवून आणलं.






