Maharashtra

Breaking: खुशखबर….! केंद्र कर्मचाऱ्यांसाठी… लवकरच 8 वा वेतन आयोग लागू…!

Breaking: खुशखबर….! केंद्र कर्मचाऱ्यांसाठी… लवकरच 8वा वेतन आयोग लागू…!

केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारची स्थापना झाली असून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चाही सुरू झाली आहे. एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक भारत सरकारच्या आठवा वेतन आयोग लागू करण्याची प्रतीक्षा करत आहेत. पगारातील असमानता आणि महागाईचा प्रभाव दूर करण्याचा या आयोगाचा उद्देश आहे.आठव्या वेतन आयोगाबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

कोट्यवधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत.एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक गेल्या काही काळापासून आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. सध्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार महागाई भत्त्यासह इतर लाभ दिले जात आहेत तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी आयोग सरकारला शिफारस करू शकते. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये ८ व्या वेतन आयोगाची मागणी जोर धरू लागली असताना केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारकडून अपेक्षा वाढली आहे.

८ वा वेतन जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकार दर दशकात नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करेल. जानेवारी २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता तर पहिला वेतन आयोग जानेवारी १९४६ मध्ये लागू झाला होता.

भारत सरकारने अद्याप ८ व्या वेतन आयोगाची स्थापना आणि अंमलबजावणीबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही .गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने ८ वा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, लोकसभा निवडणूक संपुष्टात आली असून सरकार आयोगाच्या स्थापनेकडे वाटचाल करेल, अशी शक्यता दिसत आहे. साधारणपणे, नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर त्याच्या शिफारसी सादर करण्यासाठी सुमारे १२ ते १८ महिन्यांचा कालावधी लागतो.
८ वा वेतन आयोग लागू झाल्यास सुमारे ४९ लाख सरकारी कर्मचारी तसेच ६८ लाख पेन्शनधारकांना आयोगाच्या शिफारसींचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. यामुळे फिटमेंट फॅक्टर वाढून कर्मचाऱ्यांचे मानधन सुधारले जाण्याची शक्यता असून फिटमेंट घटक वर्तमान मूल्याच्या ३.६८ पट केला जाईल असे संकेत मिळत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपये असेल तर यामुळे मूळ वेतनात ८,००० ते २६,००० रुपयांनी वाढ होऊ शकते. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि मॅट्रिक्स ठरवण्यासाठी ८ व्या वेतन आयोगांतर्गत फिटमेन्ट फॅक्टर महत्त्वाचा घटक असतो. सध्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीला प्रस्तावित ८ व्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीसह समायोजित करण्याचे त्यांचे कार्य असेल.

८ वा वेतन आयोग लागू झाल्यास इतर अनेक फायदेही अपेक्षित आहेत ज्यामध्ये वेतन श्रेणीत सुधारणा आणि उत्तम सेवानिवृत्ती लाभांचाही समावेश असेल. तसेच नवीन वेतन आयोग स्थापन झाल्यास सरकारी कर्मचाऱयांसाठ लष्करी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळेल. महागाईचा प्रभाव कमी करण्याचा या आयोगाचा मुख्य उद्देश असून सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी समान मोबदला आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button