Breaking: दिवाळीत निघणार दिवाळं की..! उद्या पासून हे होतील नवीन बदल.. जाणून घ्या रेल्वे, मनी ट्रान्स्फर आणि इतर साठीचे नियम
नोव्हेंबर महिना चालू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. नव्या महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या तारखेपासूनच अनेक महत्त्वाच्या नियमांत बदल होणार आहे. या बदललेल्या नियांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ट्रेन तिकिटापासून ते क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत अनेक नियमांत बदल होणार आहे.
प्रत्येक महिन्यात नियमात काही ना काही बदल होतो. क्रेडिट कार्ड, एलपीजी, पेट्रोल-डिझेलच्या किंमती, ट्रेनचे तिकीट तर मुदत ठेवीची अंतिम मुदतीपर्यंत अनेक नियमात 1 नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांवर दिसेल. यावेळी 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन होत आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर रोजी बदललेल्या नियमाचा तुमच्या खिशावर परिणाम दिसून येईल. पुढील महिन्यात असे बदल दिसू शकतो.
LPG सिलेंडरच्या किंमतीत बदल
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. त्या नवीन भाव जाहीर करतात. यावेळी 1 नोव्हेंबर रोजी सरकार दिवाळीत ग्राहकांना झटका देते की दिलासा देते हे उद्या समोर येईल. गेल्या काही महिन्यांपासून 14 किलोग्रॅम गॅसची किंमत कमी होण्याची मागणी करण्यात येत आहे. 19 KG एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती जुलै महिन्यात घसरल्या होत्या. त्यानंतर त्यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे.
तेल विपणन कंपन्या दरमहा सीएनजी आणि पीएनजी गस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. गेल्यावेळी किंमतीत वाढ झाली होती. यावेळी विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किंमतीत कपातीचे संकेत मिळत आहेत.
पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?
पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. सरकारी तेल कंपन्यांनी काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाहतुकीचा आंतरराज्य खर्च समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी इंधनाचे दर कमी होण्याचा अंदाज आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती निच्चांकी स्तरावर आहेत. प्रति बॅरल 72 डॉलर असे भाव आहेत.
क्रेडिट कार्डबाबतचा नियम
1 नोव्हेंबरपासून एसबीआय कार्डसंबंधीच्या नियमात बदल होणार आहे. आता सिक्युर्ड एसबीआय क्रेडिट कार्डवर दरमहा 3.75 रुपयांचा अतिरिक्त भार ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. तर वीज, पाणी, एलपीजी, गॅससह इतर युटिलिटी सेवांवर 50 हजार रुपयांच्या वरील पेमेंटसाठी 1 टक्का अधिक भार सहन करावा लागणार आहे.
ट्रेन तिकीटासंबंधी बदल
भारतीय रेल्वेच्या आगाऊ तिकीट राखीव करण्याचा कालावधी आता घटवण्यात आला आहे. 1 नोव्हेंबरपासून 120 दिवसांऐवजी आता 60 दिवसांचा हा कालावधी असेल. या नवीन प्रणालीमुळे तिकीट खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित होईल असा दावा करण्यात येत आहे.
एसबीआय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी नवीन नियम
नवीन नियम काय ? आपण पाहूया. उपप कंपनी असलेली एसबीआय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी नवीन नियम लागू करणार आहे तो नियम एक नंबर पासून आणि अनसिक्युर एसबीआय क्रेडिट कार्डवर मासिक पाहण्या चार्जेस 3.75 टक्के होणार आहे. तसेच वीज आणि गॅस सारख्या युटिलिटी बिलांच्या 50000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट वर एक टक्के शुल्क आकारले जाणार आहे.
नोव्हेंबर पासून 13 दिवस बँक बंद राहणार आहे काय अपडेट पाहूया. रिझर्व बँकेच्या अधिकृत वेबसाईट नुसार विविध राज्यांमध्ये साप्ताहिक सुट्टी आणि सणामुळे नोव्हेंबरमध्ये बँका 13 दिवस बंद राहतील या सुट्ट्यांमुळे ग्राहक बँकेच्या ऑनलाईन सेवा वापरू शकतात. या 24 तास सेवा उपलब्ध असते.
ट्रायचे नवीन नियम
स्पॅम्स कॉल आणि मेसेज नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहेत, 1 नोव्हेंबर पासून वृक्षांच्या क्षेत्रात मोठा बदल या ठिकाणी केला जाणार यामध्ये सरकारने स्पॅम थांबवण्यासाठी जीव आणि एअरटेल सारख्या दूरसंचार कंपन्यांना संदेश ट्रेकिंग लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे या ठिकाणी वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएल सारख्या सर्व टेलिफोन कंपन्यांना स्पॅम मेसेज ट्रॅक आणि ब्लॉक करावे लागणार असे देखील अपडेट या ठिकाणी आहे. आणि हे महत्त्वाचे असे बदल या ठिकाणी करण्यात येणार आहे, 1 नोव्हेंबर पासून हा बदल या ठिकाणी लागू केला जाणार आहे हे 7 महत्त्वपूर्ण बदल होते धन्यवाद.






