World

? Big Breaking..महान फुटबॉलपटू दिऐगो मॅराडोना यांचे निधन

? Big Breaking..महान फुटबॉलपटू दिऐगो मॅराडोना यांचे निधन

अर्जेंटिनाचे महान फूटबॉलपटू दिएगो म‌ॅराडोना यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. वयाच्या ६० व्या वर्षी दिएगो यांनी अखेरचा श्वास घेतला.
जगभरताली फुटबॉल रसिकांचे आवडते खेळाडू म्हणून दिएगो मॅराडोना यांचे नाव घेतले जाते.

त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांतून समोर येत आहे.
मॅराडोना यांना मागील दोन आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
जगातील एक महान फूटबॉलपटूंपैकी एक म्हणून दिएगो यांचे नाव आदराने घेतले जाते. १९८६च्या विश्वचषकात अर्जंटिनाला विजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
त्यांनी क्लॅब फूटबॉल बार्सोलिना ज्युनियर, नापोली व बार्सेलिनाकडून खेळले. त्यांच्या फूटबॉल खेळण्याच्या अनोख्या शैलीमुळे जगात त्यांचे करोडो चाहते आहेत.
Clarin broke या अर्जेंटिनाच्या न्यूज आऊटलेटने दिएगो मॅराडोना यांच्या निधनाचे वृत्त बुधवारी दिले. तसेच मॅराडोना यांच्या वकिलाने या वृत्ताला दुजोरा दिला होता. यानंतर लगेच जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांना ११ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ८ दिवसांनी पुन्हा रुग्णालयात भरती केले होते. तेव्हा त्यांच्यावर तातडीने मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button