Bollywood

Bollywood:Mahabharat:महाभारत येणार 5D मध्ये ..एकूण बजेट 700 कोटी.. हे असतील कलाकार..!

Bollywood:Mahabharat:महाभारत येणार 5D मध्ये ..एकूण बजेट 700 कोटी.. हे असतील कलाकार..!

Bollywood: अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी सिनेमांनंतर आता बॉलिवूड पौराणिक कथांकडे वळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी Disney+ Hotstar ने यूएस मध्ये सुरू असलेल्या D23 एक्सपोमध्ये काही भारतीय प्रोजेक्टची घोषणा केली होती. यामध्ये (Mahabharat) ‘महाभारत’ या मालिकेचे नावही समोर आले होते. कौरव आणि पांडवांची कथा सांगणारे, हे महापुराण प्रथम बीआर चोप्रा यांनी पडद्यावर दाखवले आणि नंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इतर दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केले. आता त्यावर एक चित्रपट बनवला जात आहे, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी दिसणार आहेत. विशेष म्हणजे, महाभारतचे मेगाबजेट असेल, ते ७०० कोटांचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

2025 मध्ये रिलीज होईल ‘महाभारत’

एका वेबसाईटने दिलेल्या वेबसाईटनुसार, फिरोज नाडियाडवाला यांनी ‘महाभारत’वर काम सुरू केले आहे. त्यांनी ‘हेरा फेरी’ आणि ‘वेलकम’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली. गेल्या ४-५ वर्षांपासून या महाभारतच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पण, निर्मात्यांना त्याच्या प्री-प्रॉडक्शनमध्ये आणखी काही वर्षे लागतील. अशा परिस्थितीत हा चित्रपट २०२५ मध्ये तयार होईल. आधी मूळ हिंदीत बनवले जाईल. नंतर इतर भाषांमध्ये डब केले जाईल आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केले जाईल.

रिपोर्टनुसार, हा चित्रपट तीन तासांचा असेल. भारत आता मार्वल आणि डीसी मुव्हीजला सडेतोड उत्तर देऊ शकेल, असा विश्वास फिरोज नाडियाडवाला यांना आहे. यासोबतच द लॉर्ड ऑफ रिंग्स, गेम ऑफ थ्रोन्स, स्टार वॉर्स, हॅरी पोर्टर यांसारख्या सर्व चित्रपटांनाही त्याच्या महाभारताला बरोबरीची स्पर्धा देताना दिसणार आहे.

दिसणार ‘हे’ स्टार्स

रिपोर्टनुसार, अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, परेश रावल, नाना पाटेकर, अनिल कपूर आणि इतर कलाकार यात दिसणार आहेत. कोणाची काय भूमिका असेल, हे अद्याप स्पष्ट गुलदस्त्यात आहे. याशिवाय निर्माते नवीन आणि प्रसिद्ध अभिनेत्रींनाही कास्ट करण्याचा विचार करत आहेत. यामध्ये साऊथ इंडस्ट्रीतील टॉप कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button