Bollywood Stories: झुकेगा नहीं साला…बायकोला किस..कॉफीचा घोट घेत सुप्रसिध्द अभिनेता अल्लू अर्जुन पोलिसांच्या स्वाधीन..14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली आहे. हैदराबादमधे पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमिअर शो वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामध्ये अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनला राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला मेडिकल स्टेस्टसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुन हैदाराबादच्या रुग्णालयात चाचण्या करताना दिसला. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. अल्लू अर्जुनला पाहून त्यावेळीही चाहत्यांनी आरडाओरड सुरू केली. दरम्यान, अल्लू अर्जुनला या प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. आता अल्लू अर्जुन जामिनासाठी अर्ज करु शकतो असे म्हटले जात आहे.






