Bollywood

Bollywood: रेखा:अमिताभ, सलमान:ऐश्वर्या एकत्र जन्मो के साथी हम साथ साथ है…!

Bollywood: रेखा:अमिताभ, सलमान:ऐश्वर्या जन्मो के साथी हम साथ साथ है…!

मुंबईत प्रसिद्ध उद्योगपती नीता अंबानी यांच्या नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घघाटन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ गेल्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सलमान खान, ऐश्वर्या रॉय आणि रेखा यांचे फोटो चाहत्यांच्या खास चर्चेचा विषय होता. आता एका फोटोनं पुन्हा लाखो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टॉलीवूडच्या रश्मिकापासून ते बॉलीवूडच्या नोरा फतेहीपर्यत मनोरंजन विश्वातील वेगवेगळे सेलिब्रेटी अंबानींच्या या सोहळयामध्ये उपस्थित होते. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, शिल्पा शेट्टी, नोरा फतेही, प्रियंका चोप्रा, सोनम कपूर, ऐश्वर्या रॉय, सुहाना खान, न्यासा देवगण, काजोल, अजय देवगण. सलमान खान, शाहिद कपूर, सबा आझाद, ऋतिक रोशन, वरुण धवन, जॅकी श्रॉफ, कपिल शर्मा यांच्यासारखे वेगवेगळे सेलिब्रेटी यावेळी उपस्थित होते.

याचवेळी ऐश्वर्या आणि तिच्या लेकीच्या फोटोंची चर्चा होती. पापाराझ्झींनी ऐश्वर्या सोबत सोलो फोटो घेण्याची विनंती केली. मात्र ऐश्वर्यानं आपण मुलीसोबतच फोटो घेऊ असे सांगितले होते. त्यानंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले. तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. याप्रसंगी मनीष मल्होत्रा, ऐश्वर्या रॉय यांच्यासोबत रेखाजींचा फोटोही व्हायरल झाला होता. ऐश्वर्याच्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवत रेखाजींचा चो फोटो पाहून चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया कमालीच्या भन्नाट होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button