Bollywood

Bollywood: दीपिका रणवीर च्या बाळाची पहिली झलक..! हे ठेवल नाव..

Bollywood: दीपिका रणवीर च्या बाळाची पहिली झलक..! हे ठेवल नाव..

अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंह सप्टेंबर महिन्यात आई-बाबा झाले. दीपिकाने ८ सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला होता. आता जवळपास दोन महिन्यांनी त्यांनी आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं, त्याची माहिती दिली आहे. दीपिकाने लेकीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून तिचं नाव जाहीर केलं आहे.

आज दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिका पादुकोणने आपल्या लेकीच्या नावाचा खुलासा केला आहे. तसेच तिने पहिल्यांदाच मुलीचा फोटोदेखील शेअर केला आहे. रणवीर व दीपिका यांनी मुलीचं नाव खूपच खास ठेवलं आहे. दीपिकाने मुलीचं नाव जाहीर करताना त्याचा अर्थही सांगितला आहे. फोटोमध्ये तिच्या गोंडस लेकीचे पाय दिसत आहेत. दीपिका व रणवीर यांनी मुलीचं नाव दुआ पादुकोण सिंह ठेवलं आहे.

Dua Padukone Singh | दुआ पादुकोण सिंह
‘दुआ’: म्हणजे प्रार्थना.

कारण ती आमच्या प्रार्थनांचे उत्तर आहे.

आमची मनं प्रेम आणि कृतज्ञतेने भरली आहेत.

दीपिका आणि रणवीर
असं कॅप्शन देत दीपिकाने मुलीचा फोटो शेअर केला आहे.दीपिका पादुकोणच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. मुलीचं नाव खूपच सुंदर ठेवलंय, अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. आलिया भट्टनेदेखील दीपिकाच्या या पोस्टवर रेड हार्ट इमोजी कमेंट्स केले आहेत.

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी झाला दुआचा जन्म
अभिनेत्री दीपिका पादुकोणला गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिने गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रणवीर व दीपिका यांनी एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली होती. दीपिका व रणवीर लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा झाले. सध्या दीपिका व रणवीर दोघेही आपल्या लाडक्या लेकीबरोबर वेळ घालवत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button