Bollywood: ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा चढली बोहल्यावर..!फोटो व्हायरल..!
अभिनेत्री राखी सावंतबाबत कधी काय बातमी समोर येईल याचा अंदाज बांधणं तसं कठीणच आहे! आता तिच्या आयुष्यातील एक खूप मोठे अपडेट समोर आले असून तिचे फोटोही व्हायरल झालेत. अभिनेत्री राखी सावंत हिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीशी लग्न केले आहे. त्यांचे गळ्यामध्ये वरमाला घातलेले फोटो व्हायरल होत आहेत. त्यांचे विवाह प्रमाणपत्रासोबतही त्यांनी पोज दिली, याशिवाय या सर्टिफिकेटवर सही करतानाचाही फोटो समोर आला आहे. ही बातमी मिळताच अभिनेत्रीच्या चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे, मात्र अद्याप राखी किंवा आदिल यांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये राखी सावंत भारतीय पोषाखामध्ये दिसली. तिच्या आणि आदिलच्या गळ्यात वरमाला आहे आणि त्यांनी मॅरेज सर्टिफिकेटसोबतही फोटो काढला आहे.
राखीचा आणखी एक फोटो व्हायरल होतोय ज्यात ती एका कागदपत्रावर सही करत आहे. असे बोलले जात आहे की हे आदिल-राखीचे विवाह प्रमाणपत्र आहे. या फोटोमध्ये तिच्या बाजूला आदिल बसला आहे. तर संबंधित कागदपत्रावर राखी आणि आदिल यांचा फोटोही दिसतो आहे.
राखीचा आणखी एक फोटो व्हायरल होतोय ज्यात ती एका कागदपत्रावर सही करत आहे. असे बोलले जात आहे की हे आदिल-राखीचे विवाह प्रमाणपत्र आहे. या फोटोमध्ये तिच्या बाजूला आदिल बसला आहे. तर संबंधित कागदपत्रावर राखी आणि आदिल यांचा फोटोही दिसतो आहे.
रितेशशी नातं बिनसल्यानंतर आदिलला करतेय डेट
राखीने २०१९ मध्ये एनआरआय असणाऱ्या रितेशसोबत लग्न केलेले. दोघे रिअॅलिटी शो बिग बॉसमध्येही दिसले होते, पण २०२२ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी राखी आणि आदिलने डेट करण्यास सुरुवात केली. राखी जवळपास रोज आदिलसोबत पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होते.






