बोगस शिक्षक भरती प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
देशासह राज्यात अनेक शैक्षणिक संस्था द्वारे संचलित शाळेत बोगस शिक्षक भरती प्रक्रिया बोगस संच मान्यता, इत्यादी मार्ग अवलंबून शिक्षण विभागा कडुन व्यैकतिक मान्यता मिळवून घेत आहे.या बाबत च्या बातम्या अधुन मधुन वृत्त पत्रात वाचायला मिळत असतात.
यात भर टाकण्या साठी इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा ता रावेर जि जळगाव या शैक्षणिक संस्थे द्वारे संचलित अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव येथे सुद्धा बोगस शिक्षक भरती करण्यात आल्याचे धक्का दायक प्रकार संदर्भात संस्थेचे एका संचालकाने लेखी तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक जळगांव , शिक्षण अधिकारी माध्यमिक जळगांव यांचे कडे केली आहे.
भोंगळ कारभार करण्या मध्ये बहुचर्चित अॅगलो शाळा व संस्था यांनी बनावट संच मान्यतेचया आधारे वर्ष 2012 पासून भरती दाखवलेल्या तीन शिक्षकांची भरती प्रक्रिया 2019 राबवून बनावट कागद पत्रांच्या आधारावर व्यक्तिक मान्यता व आर्थिक लाभ मिळवून घेतल्या चा धक्का दायक अदधुत प्रकार सावदा येथे अॅगलो उर्दू हायस्कूल मध्ये घडल्याची खात्री लायक माहिती आहे.सदरील प्रकरण त्या वेळचे माध्यमिक शिक्षण अधिकारी हे सुध्दा अप्रत्यक्ष कारणीभूत आहे.
दिलेल्या तक्रारीत मुख्याध्यापकांच्या बनावट सह्यांचा वापर करून वैयक्तिक मान्यता व वेतन विभाग जळगांव येथे शासनाची फसवणूक करून आर्थिक लाभ उचलण्या कामी प्रस्ताव सादर आहे. सदरील गंभीर प्रकरणाची मुख्याध्यापकांना माहिती मिळताच त्यांनी त्या वेळी हरकत घेतलेली आहे. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक जळगांव कडे सुध्दा तक्रार दाखल केल्या ची खात्री शीर माहिती मिळाली आहे.
शासनाची व जनतेची दिशाभूल व फसवणूक होऊ नये निव्वळ या मुख्य हेतू ठेऊन सदरील प्रकरण संस्थेच्या एका संचालकाने पुराव्यानिशी तक्रार केली आहे.
या मुळे भविष्यात या तीन शिक्षकांवर कारवाई ची टांगती तलवार आहे.
या मुळे सावदा व परिसरात चर्चेला एकच उधाण आलेले आहे.व भरती प्रक्रिये साठी संपर्क करणाय्रांनाही मोठा धक्का बसला आहे. व चुकीचे मार्ग अवलंबणाय्रांवर काय कारवाई होईल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






