बी एल ओ चे आपल्या विविध मागण्यांसाठी अमळनेर तहसीलदारांना निवेदन
अमळनेर तालुक्यातील व शहरातील सर्व बी एल ओ नी दि. १० डिसेंबरला आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयात निवेदन दिले. निवेदन देते वेळी माननीय तहसीलदार श्री मिलिंद वाघ यांच्या वतीने नुकतेच रुजू झालेले श्री अमोल पाटील यांनी निवेदन स्वीकारले. त्यावेळी झालेल्या चर्चेत व पत्रकात बी एल ओ नी आपल्या सर्व मागण्या सांगितल्या. त्यात गेल्या दहा वर्षापासून जे शिक्षक बी एल ओ
म्हणून काम करत आहेत त्यांची ड्युटी रद्द होऊन नवीन बी एल ओ नियुक्त करन्यात यावे.मागील दोन वर्षांपासून थकित असलेले बी एल ओ मानधन त्वरित अदा करावे. गरुडा ऍप्सच्या माध्यमातून जी कामे ऑनलाईन करून घेतली जातात त्यासाठी विविध सुविधा पुरविल्या जाव्यात. त्यात ऑनलाइन कामांसाठी टॅब व लॅपटॉप देणे,
इंटरनेट डेटा उपलब्ध करून देणे,
वेळोवेळी प्रशिक्षण देणे या व अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी तालुक्यातील व शहरातील सर्व उपस्थित होते त्यात दिनेश पालवे, संदीप पाटील, राहुल देसले ,अजय भामरे ,निखिल पाटील ,विनोद पाटील ,कृष्णा कोळी ,मकरंद निळे, सचिन अहिरे ,सुहास खांजोडकर, सुधाकर महाजन, किरण ठाकूर, एस. व्ही. पाटील संजय सोनवणे,सुधाकर महाजन आदी हजर होते.






