Bollywood

बिग बॉस 15 होणार बंद..टीआरपी चा प्रॉब्लेम की आणखी काही..!

बिग बॉस 15 होणार बंद..टीआरपी चा प्रॉब्लेम की आणखी काही..!

बिग बॉसचा हा रिऍलिटी शो नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. हिंदी बिग बॉसचा सध्या १५ वा सिजन प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मात्र हा रिऍलिटी शो आता लवकरच बंद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हिंदी बिग बॉसच्या १५ या सिजनमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्या प्रेमातील गमतीजमतीमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत होते, मात्र आरोग्याच्या कारणास्तव राकेश बापटने बिग बॉसचे घर सोडले. त्यानंतर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर आणि करण कुंद्रा यांच्यात प्रेम जुळून आलेले दिसले.

मात्र त्यांचे हे प्रेम खोटं असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यापासून बिग बॉसचा १५ वा सिजन वादांमुळे आणि खोटं वाटल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून या शोचा टीआरपी खूपच खाली घसरला आहे. सहभागी झालेल्या स्पर्धकांचे मानधन आणि सलमान खानला दिले जाणारे मानधन या सर्वांचा खर्च ५०० कोटींच्या घरात जात आहे. पण त्यातून प्रेक्षकांचा प्रतिसाद मावळल्याने निर्मात्याला खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शोचा टीआरपी वाढवा म्हणून निर्मात्याकडून अनेक प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी काही सेलिब्रिटींनी देखील आठवड्याला बोलावण्यात आले. असे असले तरी सुरुवातीला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा ह्या आठवड्यात प्रेक्षकांकडून खूपच कमी प्रतिसाद मिळाला असल्याने हा शो लवकरच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉसचा शो संपण्यासाठी अजून काही कालावधी जाणार होता मात्र अल्पशा प्रतिसादामुळे तो वेळेच्या अगोदरच बंद करण्यात येईल अशी जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या घरात वादामुळे चर्चेत राहिलेली अफसाना खान नुकतीच घराबाहेर पडली आहे. अफसाना बिग बॉसच्या घरात राहून सतत ओरडून बोलत होती, अनेकदा सदस्यांसोबत वाद घातल्याने प्रेक्षकांना तिचे वागणे रुचले नाही. ह्या आठवड्यात बिग बॉसने आदेश देऊनही अफसानाने बिग बॉसचे घर सोडले नव्हते. बिग बॉसचा आदेश न पाळता ती तशीच घरात ठाण मांडून होती. त्यावेळी तिला घराबाहेर काढण्यासाठी बिग बॉसच्या क्रू टीमला पाठवण्यात आले होते. बिग बॉसचा १५ वा सिजन आटोपता घेत असल्याने काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी दर्शवली आहे तर अनेकांनी ता बातमीवर आनंद व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button