Mumbai

10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी..!शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा..!

10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी..!शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा..!

मुंबई डॉ वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 मार्चपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. तर विद्यार्थ्यांना 3 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. अनेक तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असतात. मात्र आता 3 मार्च पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
दहवीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही.
शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button