Mumbai

?Big Breaking..मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, वेब सिरीजच्या नावाखाली अभिनेत्री करत होती हे काळेधंदे

?Big Breaking..मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, वेब सिरीजच्या नावाखाली अभिनेत्री करत होती हे काळेधंदे

मुंबई: अभिनय क्षेत्रात नशीब आजमवायला अनेक कलाकार मुंबईची वाट धरतात. मात्र, प्रत्येकालाच या क्षेत्रात यशस्वी होता येतं असं नाही. या कलाकारांचा अनेकदा फायदा उठवला जातो. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. वेबसिरीज, शॉर्ट फिल्म तसेच टीव्ही मालिकांमध्ये काम देतो असे सांगून अभिनयाच्या क्षेत्रात नशीब अजमाविण्यासाठी मुंबईत येणाऱ्या तरुणींच्या अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या एका पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मढ बीचवरील एका बंगल्यात छापा टाकून पोलिसांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

धक्कादायक म्हणजे, याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. दोन अभिनेत्यांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ शुट करून वेबसाईटवर अपलोड केले जात होते. स्वतः प्रोडक्शन हाऊस तयार करून पॉर्न व्हिडीओ साईटवर अपलोड केले जात असल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला.
या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर अभिनेत्री गहना वशिष्ठचं नाव उघडकीस आलं. गहनाचं स्वतःच प्रोडक्शन हाऊस असल्याचंही समजतंय. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करायची आणि ते वेबसाईटवर अपलोड करायची, असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी गहनाला अटक केली आहे. तिला न्यायालयासमोर हजर केलं जाईल.

या कारवाईत पॉर्न साईट आणि मोबाइल ऍपच्या माध्यमातून अश्लील चित्रफितींचा व्यवसाय करणाऱ्या दोन अभिनेत्यांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून हे सर्व बॉलिवूडशी संबंधित आहेत.
अभिनयाची आवड असलेले अनेक तरुण आणि तरुणी मुंबईत येत असतात. अभिनय क्षेत्रात संधी मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. याच परिस्थितीचा पुरेपूर फायदा बॉलिवूडशी संबंधित काही मंडळी घेत असून उपनगरात बंगले भाड्याने घेऊन त्यांच्या अश्लील व्हिडीओ बनवले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली.

प्रभारी पोलिस निरीक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धीरज कोळी, सहायक निरीक्षक लक्ष्मीकांत साळूंखे, सुनील माने, अमित भोसले, योगेश खानुरे, अर्चना पाटील, सोनाली भारते यांच्या पथकाने मढ बीचवरील ग्रीन पार्क बंगल्यात छापा टाकला. यावेळी पलंगावर एका अश्लील व्हिडिओचं शूटिंग सुरु होते. पोलिसांनी हे करणाऱ्या सहा जणांना बंगल्यातून अटक केली. यामध्ये अभिनेत्रीसह दोन अभिनेता, एक ग्राफिक डिझायनर महिला, फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांना समावेश आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button