India

? Big Breaking…मोदींच्या डिजिटल इंडियाला.. डिजिटल प्रोटेस्ट..चोख प्रत्युत्तर

? Big Breaking…डिजिटल इंडिया.. डिजिटल प्रोटेस्ट..

प्रा जयश्री दाभाडे

मी आता पर्यंत राष्ट्रीय बेरोजगारी दिन ऐकला नव्हता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिना निमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिवस हा ट्रेंड संपूर्ण देशात च नव्हे तर जगात सर्वात जास्त प्रसिद्ध झाला..आता पर्यंत ‘आंतरराष्ट्रीय रोजगार दिन’ बद्दल ऐकले होते. जेव्हा जग महामंदीच्या चक्रात होते तेंव्हा जगात देखील असा दिवस मनविला नव्हता… एक काळ असा होता की संपुर्ण जगात सर्वत्र अनागोंदी होती आणि बेरोजगारांची संख्या सतत वाढत होती. तरीही बेरोजगार दिवस मनविण्यात आला नव्हता.1930 मध्ये अमेरिकेत असा प्रोटेस्ट रस्त्यावर उतरून लाखो लोकांनी केला होता.

संपूर्ण जगात मानवी इतिहासातील सर्वात मोठा साथीच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे आणि या पार्श्वभूमीवर संपुर्ण जग आर्थिक मंदीच्या वाटेवर आहे. अश्या परिस्थितीत राष्ट्रीय बेरोजगार दिवसाच्या हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेकडो ट्वीट शेअर केले आहेत. अचानक सोशल मीडियावर राष्ट्रीय बेरोजगार दिवसाची लाट उसळली आणि अत्यन्त कमी वेळात तो ट्रेंड प्रसिद्ध झाला..

गेल्या 45 वर्षात सर्वात मोठी बेरोजगारी देश अनुभवत आहे.जी आश्वासने मोदी सरकारने जोर जोरात भाषणाच्या माध्यमातून दिली होती त्यातील बेरोजगारी हटाव हे ही एक आश्वासन होते.परंतु गेल्या 6 वर्षात दोन वेळा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारी हटविण्या पेक्षा बेरोजगारी वाढविली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे करोडो युवक आज बेरोजगार असून शिक्षण घेऊन ही उच्चशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध नसल्याचे चित्र देशात आहे.राजस्थान चे हंसराज मिना यांनी राष्ट्रीय बेरोजगार दिनाची प्रथम ट्विट केले आणि यानंतर सुरू झाले ट्विट चे वादळ…आणि अत्यन्त कमी वेळात संपूर्ण सोशल मीडियावर हा ट्रेंड प्रसिद्ध झाला..विपक्ष जो झोपलेला आहे तो अचानक जागा झाला आणि राहुल गांधी झोपेतून उठले आणि त्यांनी ट्विट केले..मोदी सरकारने रोजगार क्षेत्रात हुकूमशाही करत खाजगीकरण करण्याचा चंग बांधला आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांचे खाजगीकरणं करून बेरोजगारी वाढविण्यासाठी एक प्रकारे खत पाणी घातले आहे. रेल्वे,पोस्ट खाते, बँक इ जास्त उत्पादन करणाऱ्या केंद्र सरकारचे मोठे प्रोजेक्टचे विलीनीकरण, भरती प्रक्रिया चे खाजगीकरण इ बेरोजगारी च्या अनुषंगाने घातक ठरत आहे. पोस्ट खात्या सारख महत्वपूर्ण विभाग डब घाईला आलं आहे. फक्त वीज बिल आणि टेलिफोन बिल भरण्या पुरताच पोस्ट खात्याचा उपयोग केला जात आहे.अशी अनेक उदा आपल्याला देता येतील.
दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन खूपच मागे राहिले आहे. मोदींच्या डिजिटल इंडिया ला चोख प्रत्युत्तर जनतेने युवकांनी डिजिटल प्रोटेस्ट करून दिले आहे.आणि एकाच ट्रेंड ने सरकारलाच नव्हे तर मोदींनाही विचारात पाडले आहे.आता हे पाहणे महत्वाचे ठरेल आयटीसेल यावर कोणता नवीन डिजिटल ट्रेंड आणेल?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button