India

?Big Breaking.. देशात पहिल्यांदाच “ह्या” महिलेला दिली जाईल “फाशी”..!प्रेमासाठी केले होते 7 खून..!कोण आहे ही महिला..?

?Big Breaking.. देशात पहिल्यांदाच “ह्या” महिलेला दिली जाईल “फाशी”..!प्रेमासाठी केले होते 7 खून..!कोण आहे ही महिला..?

नवी दिल्ली : भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर कधीही कोणत्याही महिलेला फाशी दिली गेली नव्हती. मात्र, आता एका महिलेला फाशी दिली जात आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे राहणाऱ्या शबनम या महिलेने 2008 मध्ये प्रियकरासोबत मिळून कुटुंबातील 7 जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली होती. यामध्ये ही महिला दोषी ठरली असून, आता तिला फाशी दिली जाणार आहे.

स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधील शबनम (Shabnam will be first women in Independent India to be hanged ) या महिलेनं २००८ साली आपल्या प्रियकरासोबत आपल्या नात्यातल्या 7 जणांचा कुऱ्हाडीने खून केला होता. या प्रकरणात शबनमला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

राष्ट्रपतींनीही तिचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. मथुरा जेलमध्ये तिला फाशी होईल. फाशीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली आहे. निर्भया प्रकरणातल्या आरोपांना फाशी देणारा पवन जल्लादचीच या फाशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. फाशीची तारीख मात्र अजून निश्चित झालेली नाही.

मथुरा जेलमध्ये जवळपास दीडशे वर्षांपूर्वीच महिला फाशीघर बनवण्यात आलं पण तिथे आत्तापर्यंत कोणाही महिलेला फाशी दिली नाही. मात्र आता इथे शबनमला फासावर लटकवण्यात येईल. पवन जल्लादने दोन वेळा या फाशीघराचं निरीक्षण केलं आहे. त्याला त्यात फाशीचं तख्त आणि लिव्हरमध्ये काही दोष जाणवले आहेत. ते तातडीने दुरूस्त केले जात आहेत. बिहारमधील बक्सरमधून फाशीसाठी दोरखंड मागवण्यात आला आहे.

शबनम या आरोपी महिलेने फाशी शिक्षा कमी व्हावी, यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तिला कोणताही दिलासा न देता फाशीची शिक्षा कायम ठेवली. तसेच तिने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडेही दया याचिका दाखल केली होती. पण राष्ट्रपतींनीही ती याचिका फेटाळून लावली होती.
त्यामुळे तिची फाशीची शिक्षा कायम राहिली.

आत्तापर्यंत कोणत्याही महिलेला झाली नाही फाशी

मथुरा कारागृहात 150 वर्षांपूर्वी महिला फाशीघर बनवण्यात आले होते. मात्र, स्वातंत्र्यानंतर कोणत्याही महिलेला आत्तापर्यंत फाशी दिली गेली नाही. पण आता आरोपी शबनम या महिलेला फाशी दिली जाणार आहे. त्यानुसार, तुरुंग प्रशासनानेही त्याबाबतची तयारी सुरु केली आहे.

बिहारहून मागविण्यात आली दोरी

या फाशीचा दोर बिहारच्या बक्सर येथून मागविण्यात आला आहे. तसेच जर शेवटच्या क्षणी कोणतीही अडचण न आल्यास शबनम पहिली महिला असेल तिला फाशीची शिक्षा होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button