?Big Breaking.. अखेर व्हॉट्सअॅपचे एक पाऊल मागे…व्हाट्सएपच्या प्रायव्हसी पॉलिसी साठी होणारे बदल टाळले..
नव्या पॉलिसीमुळे युजर्समध्ये नाराजीचे तसेच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने व्हॉट्सअॅपने सध्या आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये होणारे बदल पुढे ढकलले आहेत.
काय होते बदल..
● आमच्या प्रायव्हसी पॉलिसीतील बदलांबाबत युजर्समध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
● त्यामुळे सध्या ही व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसी स्थगिती केली जात आहे.
● जेणेकरुन युजर्सला याबाबत रिव्ह्यू करण्यास आणि समजण्यास आणखी काही वेळ मिळेल.
● 8 फेब्रुवारीपासून कोणत्याही युजरचं अकाउंट सस्पेंड किंवा डिलीट केले जाणार नाही.
● त्यासोबतच आम्ही व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीबाबत पसरत असलेल्या चुकीच्या माहितीबाबत लोकांसमोर स्पष्ट करण्याचं काम करत आहोत.
नेमके प्रकरण काय?
कंपनी 8 फेब्रुवारीपासून आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी लागू करणार होती, त्यासाठी युजर्सना एक ‘Terms & Conditions’ मेसेज पॉपअप होत होता. त्याला स्वीकारणे आवश्यक होते. अन्यथा त्यांचे अकाउंट सस्पेंड केले जाणार होते.
दरम्यान 15 मे रोजी व्यावसायिक पर्याय उपलब्ध करण्यापूर्वी नव्या प्रायव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी हळूहळू लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, असेही व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.






