?Big Breaking…हे तीन दिवस बँका बंद! खाजगी करणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचा संप
सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांचे तसेच बँकांचे खाजगीकरण करण्याच्या निर्णयाचा विरोध म्हणून बँक कर्मचारी संघटनांनी येत्या 15 आणि 16 मार्च रोजी संप पुकारला आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (युएफबीयु) झालेल्या बैठकीत संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
युएफबीयुमध्ये सामील असलेल्या बँक संघटनांमध्ये एआयबीईए, एआयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनबीओडब्ल्यू या 9 बँक कर्मचारी संघटनांचा समावेश आहे.
दरम्यान दोन दिवस (15 आणि 16) बँका बंद राहणार असून 14 तारखेला रविवार आला असल्याने सलग तीन दिवस बँक बंद राहणार आहेत.






