Mumbai

? Big Breaking..एकनाथराव खडसे यांची ईडी कडून 6 तास कसून चौकशी…आता लावतील का खडसे सीडी..!

? Big Breaking..एकनाथराव खडसे यांची ईडी कडून 6 तास कसून चौकशी…

पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी ..!

मुंबई: पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची आज ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली. ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. ईडीला जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा तेव्हा त्यांना सर्व सहकार्य करण्यात येईल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज सकाळीच ईडीच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांची साडे सहातास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्या कन्येचीही चौकशी करण्यात आली. या चौकशी नंतर संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारे खडसे ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी मीडियाने त्यांना गराडा घातला असता खडसे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी मला जेव्हा जेव्हा कागदपत्रं आणि इतर माहितीसाठी बोलावेल तेव्हा तेव्हा मी हजर राहीन. ईडीला सर्व सहकार्य करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, आजच्या चौकशीत काय काय विचारणा करण्यात आली हे मात्र समजू शकले नाही.

जमीन प्रकरण काय आहे..?

खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे खरेदी केलेल्या जमिनीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद सोडावे लागले होते. नंतरच्या काळात एकनाथ खडसे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे गेले होते. मात्र, या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. हा 40 कोटींचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असल्याचं सांगितलं जातं. हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी असल्याचं सांगतिलं जातं.

ईडी लागली तर मी सीडी लावीन…!

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते.

एकनाथराव खडसे यांना ईडीने 30 डिसेंबर रोजी चौकशीकामी हजर राहण्यासाठी समन्स बोलावले होते. त्याच कालावधीत त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे एकनाथराव खडसे क्वारेंटाइन झाले होते. 14 दिवसांनंतर 15 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले. चौकशी दरम्यान त्यांच्या कन्येची देखील चौकशी झाल्याचे समजते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button