? Big Breaking..सावदा ग्रामीण रुग्णालयात एक महिन्यापासून डॉक्टरच नाही
संकट काळात गरीब गरजू रुग्णांवर मोठे संकट
सावदा प्रतिनिधी युसुफ शाह*
दि 20सप्टेंबर 2020
सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे सुरू करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय येथील गोर गरिबांचा आधार ठरलेला होता परंतु कोरोना महामारी च्या या संकट काळात देशभरात लावण्यात आलेले लोक डाऊन मुळे सर्व क्षेत्राची व नागरिकांची प्रत्येक स्तरावर दशा बिघडली असल्याने गोरगरीब गरजू रुग्णांसाठी हा ग्रामीण रुग्णालय मुर्दे को रात आडी याकरिता तरी सोयीचे वाटत होते परंतु एक महिन्यापासून येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे शहरासह परिसरातील रुग्णांचे मोठे हॉल होत आहेत.
डॉक्टर आभावी रुग्णालय असूनसुद्धा नसल्यासारखे म्हणजे जूता है तो मुजा गायब अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे रुग्णालय असूनही रुग्ण उपचारापासून वंचित आहेत व यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे नाईलाजास्तव काही रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे यात ज्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे असे रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेऊ शकत नसल्याने त्यांच्यासमोर या संकट काळात अधिक संकट निर्माण झालेले आहे कारण की कोरोना महामारी मुळे लॉक डाऊन मध्ये काम धंदा नसल्यामुळे आधीच नागरिक त्रस्त झालेलेआहेत अशावेळी ग्रामीण रुग्णालय म्हणजे गरीब गरजू लोकांकरिता काहीही असो आधारस्तंभ असते.
तसेच सदरील ग्रामीण रुग्णालय हा मुक्ताईनगर मतदान क्षेत्रात येत असल्याने ज्याप्रमाणे माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय ची दखल घेऊन त्याचे कामाला गती व सोय सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याच धर्तीवर त्यांनी सावदा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करून द्यावे जेणेकरून या संकट काळात गरीब गरजू लोकांचे होणारे हाल थांबतील






