Maharashtra

शिरूड येथे पंतप्रधान कल्याण योजने अंतर्गत लाभार्थींना मोफत धान्य वाटप लाभार्थींना मिळाला लाभ

शिरूड येथे पंतप्रधान कल्याण योजने अंतर्गत लाभार्थींना मोफत धान्य वाटप
लाभार्थींना मिळाला लाभ

रजनीकांत पाटील

अमळनेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाउन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये
यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे
राज्यात धान्य वितरण सुरू आहे अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे 16/04/2020 रोजी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लाभार्थींना प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ घरपोच नागरिकांना मिळवून दिला.
कोरोणाचा प्रादुर्भाव तसेच प्रसार होऊ नये म्हणून सुरक्षित अंतर ठेऊन गावातील विकास सोसायटी चेअरमन सुभास पाटील व रेशन दुकानदार विरभान पाटील, गावातील सरपंच सुपडू पाटील, ग्रामसेवक गुलाबराव सूर्यवंशी,तलाठी सोनवणे आप्पा ग्रा.पं सदस्य बापूराव महाजन,वी.सो.सा शिपाई बापू मोरे गावातील कार्यकर्ते शशिकांत पाटील,विजय पाटील,मिलिंद पाटील,भाऊसाहेब वारुळे,काशिनाथ माळी यांच्या समक्ष ही वाटप करण्यात आली.
तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button