Maharashtra

बारामती न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची शिक्षा

बारामती न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची शिक्षा

प्रतिनिधी- आनंद काळे ठोस प्रहार न्युज

बारामती- बारामती तालुक्यामध्ये लॉकडाउन दरम्यान मोकळ्यात फिरणे,संचारबंदीचे उल्लंघन करणे आदी कारणास्तव बारामती न्यायालयाने तिघांना प्रत्येकी तीन दिवस तुरुंगवास व पाचशे रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.
बारामती शहरामध्ये लॉकडाऊन दरम्यान संचारबंदी असताना हे तिन्ही व्यक्तीने संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे.देशांमध्ये पहिलाच असा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.लॉकडाउन दरम्यान आत्ता मोकाट फिरणे व संचारबंदीचे उल्लंघन करणे आत्ता सोपे राहिले नाही.आत्ता संपूर्ण देशातील जनता ह्यातून काय बोध घेईल,हे पुढील काळात दिसून येईल.

तीन दिवसांची साधी शिक्षा असली तरी त्या लोकांना भविष्यात त्यांना नोकरी,पासपोर्ट,चारित्र्य पडताळणी आदी संदर्भात अडचण येणार आहे.त्यामुळे जनतेने ह्यातून बोध घेऊन लॉकडाउन दरम्यान कोणीही मोकाट फिरायचे नाही,संचारबंदीचे उल्लंघन करायचे नाही.प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button