बारामतीच्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदातील तिघे जण
प्रतिनिधी- आनंद काळे
बारामती- बारामतीच्या कोरोनाबधित रुगण्याच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील तिघेजण असल्याची माहिती मिळाली आहे.त्या तीनही जणांना तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात येणार आहे असे आरोग्यतापसनी यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.अहमदनगर व जमखेडमध्ये प्रत्येकी दोन कोरोनाबधित रुग्ण सापडले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.
बारामती येथे एक कोरोनाबधित रुग्ण सापडला आहे. ह्या रुग्णाच्या संपर्कात श्रीगोंदातालुक्यातील हे तिघेजण 20 मार्चला शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते त्यावेळी कोरोनाबधित रुगण्याचा संपर्कात आले होते.
कोरोनाबधित रुगण्याच्या संपर्कात आल्यामुळे ह्या तिघांना तपासणीसाठी अहमदनगरला पाठविण्यात येणार आहे.तपासणीचा रिपोर्ट कसा येईल त्याच्यावर पुढील ट्रीटमेंट अवलंबून आहे.असे आरोग्यविभागाकडून सांगण्यात आले आहे व कोणीही मोकळ्या वेळेत घराबाहेर फिरू नये,कारण कोरोनाचा प्रादुर्भाव हा ग्रामीण भागात पोहचला आहे.सर्वानी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आरोग्य प्रशासनकडून सांगण्यात येत आहे.






