Mumbai

सायन सर्कल येथील बँक ऑफ बडोदाच्या परिसरात बनावट भारतीय चलनी नोटा जप्त..गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कार्यवाही…

सायन सर्कल येथील बँक ऑफ बडोदाच्या परिसरात बनावट भारतीय चलनी नोटा जप्त

मुंबई पी व्ही आंनद

गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४, अॅन्टॉपहील, मुंबई येथील स.पो.नि पाटील यांना
रोजी सायन सर्कल येथील बँक ऑफ बडोदाच्या बाजुला एक इसम बनावट भारतीय चलनी नोटा घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती.

सदर माहीतीची खातरजमा करून प्र.पो.नि. निनाद सावंत व कक्ष-४च्या अधिकारी व अंमलदार यांनी नमुद ठिकाणी सापळा लावला होता. सदर कारवाईत भास्कर मुर्गन नाटर, वय ४३ वर्षे रा. वेल्लुर तामिळनाडु याच्या ताब्यातून २०००, ५००, २०० रुपये दराच्या रू. १,२८,६००/- किंमतीच्या एकूण १५१ बनावट भारतीय चलनी नोटा हस्तगत करण्यात आल्या होत्या. सदरबाबत सुरवातीस सायन पोलीस ठाणे येथे गु.क्र ५१/२०, कलम
४८९(ब)(क) भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवून तद्नंतर त्याचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा का ४, मुंबई यांच्याकडून करण्यात येत होता.

सदर कारवाईत हस्तगत करण्यात आलेल्या बहुतांश नोटांचे सिरीयल नंबर एकच असल्याचे दिसुन आले होते. यावरून काही ठराविक नोटांचा वापर करून त्यावरून इतर बनावट नोटा बनविल्या जात असाव्यात, अशी शंका
बळावली होती. उपरोक्त प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी भास्कर मुर्गन नाटर याच्याकडे बारकाईने चौकशी केली असता, तो त्याच्याविरुध्द अॅन्टापहिल पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गु.खा१८३/११ कलम ३९३,४५२,३४ भादवि च्या न्यायालयातील तारखेसाठी मुंबईत आला होता. तो मुंबईस येण्यासाठी निघाला असताना, सदरच्या बनावट नोटा तामिळनाडूतील सर्वनन बनियार याने मुंबईतील एका इसमास देण्यासाठी त्याच्याकडे दिल्या असल्याची माहिती त्याने तपासात दिली होती.

आरोपीने दिलेल्या उपरोक्त माहितीवरून, कक्ष – ४, गुन्हे शाखेचे एक पथक सपोनि राजेश पाटील यांच्या अधिपत्याखाली अटक आरोपीसह तामिळनाडू येथे पाठविण्यात आले होते. सदर पथकाने आज रोजी तामिळनाडूतील अयानुर, तालुका अंबुर, जिल्हा तिरुपुथूर येथे सर्वनन गोविंद वनियार, वय ४५ वर्षे, याचे राहत्या घरी धाड टाकली असता, त्याच्याकडे ५०० रू. दराच्या १४७६/- व २०० रु. दराच्या ८५ अशा एकूण रु ७.५५,०००/- किंमतीच्या १,५६१ बनावट नोटा मिळून आल्या आहेत. सदर प्रकरणी यापुर्वी हस्तगत केलेल्या १,२८,६००/- रूपयांच्या नोटाबमिळून आजपर्यंत एकुण ८,८३,६००/-रूपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

तामिळनाडू येथे टाकलेल्या छाप्यात बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे एक स्कॅनर कम प्रिन्टर, पेपर कटर, कात्री, हिरवट रंगाचा प्लॉस्टिक रोल इत्यादी साहित्य मिळून आले आहे. आरोपी भारतीय चलनातील नोटा स्कॅन करून त्यांच्या प्रिंट अठड्स घेत असल्याचे व त्यानंतर हिरवट रंगाच्या प्लास्टिक रोलचे तुकडेबनोटेवर चिकटवून सिक्युरिटी ग्रेड तयार करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

मंबई गन्हे शाखा, का-९च्या पथकाने गत आठवडयात २,९५,०००/- रूपये किंमतीच्या बनावट नोटा पकडून ३ आरोपींना अटक केली होती. सदर प्रकरणाचे धागेदोरेदेखील तामिळनाडू येथे पोहचले होते. कक्ष – ४ ने
केलेल्या सदर कारवाईतील आरोपीदेखील तामिळनाडू राज्याचे रहिवाशी असल्याने दोन्ही प्रकरणातील आरोपीचा परस्परसंबंध पडताळण्यात येत आहे.

मागील महिन्याभरात मुंबई गुन्हे शाखेने, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रू. २३,८६,000/-
किंमतीच्या बनावट नोटा पकडल्या होत्या. त्या पाठोपाठ कक्ष – ९ च्या पथकाने रू. २,९५,000/- किंमतीच्या
बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या.

नुकतेच कदा – ४ च्या पथकांगी मुंबईत पकडलेल्या आरोपीमार्फत तामिळनाdu राज्यात जावून सदरची भरीव कामगिरी केली असून, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री संतोष रस्तोगी-यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गुन्हे शाखेने बनावट चलनी नोटांसंबधीची कारवाई अधिक तीव्र केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button