World

Asia Cup 2022: सुपर 4 मध्ये सर्वात आधी जाईल हा संघ..!

Asia Cup 2022: सुपर 4 मध्ये सर्वात आधी जाईल हा संघ..!पहा सुपर 4 चे वेळापत्रक..!

आशिया कप 2022 स्पर्धेच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. भारताने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात देत आघाडी घेतली आहे. दरम्यान अफगाणिस्तानचा संघ सर्वात आधी सुपर 4 मध्ये एन्ट्री करेल असं भाकित माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्रा याने केलं आहे. त्याचं असं म्हणण्यामागील कारण म्हणजे अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंका संघाला दमदार अशी मात दिली. त्यामुळे आता बांग्लादेशविरुद्धचा दुसरा सामना अफगाणिस्तानने जिंकल्यास ते थेट सुपर 4 मध्ये पोहचू शकतात. अफगाणिस्तानचा फॉर्म पाहता ते बांग्लादेशला मात देऊ शकतात अशी भविष्यवाणी आकाश चोप्राने केली आहे.
शारजाह येथे होणाऱ्या बांग्लादेशविरुदद्ध अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तान बांग्लादेशला हरवेल. या विजयासह अफगाणिस्तान सुपर 4 साठी पात्र ठरणारा पहिला संघ बनेल आणि बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना हा नॉकआऊट सामना होईल. दोघांच्यात जिंकणारा संघ सुपर 4 तर दुसरा संघ थेट स्पर्धेबाहेर जाईल.

कसं आहे उर्वरीत ग्रुप स्टेजच्या सामन्यांचं वेळापत्रक?

31 ऑगस्ट – भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.

Asia Cup 2022: सुपर 4 मध्ये सर्वात आधी जाईल हा संघ..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button