Maharashtra

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना गणवेशासाठी १२०० रुपये मिळणार

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना गणवेशासाठी १२०० रुपये मिळणार.

रजनीकांत पाटील

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी व भत्ते लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे शासन दरबारी आंदोलने करीत आहेत.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना गणवेशासाठी मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी. अशी ही मागणी संघटनेने शासनाकडे केली होती. सदर मागणीची दखल घेत शासनाने सन २०२०-२०२१ या वर्षाच्या पीआयपी नुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना गणवेशासाठी प्रत्येकी १२०० रूपये मंजूर करण्यात आले असल्याचे पत्र दि.१४ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (अतांत्रिक) श्री. महेश बोटले यांनी काढले आहे.

सदर आदेशानुसार राज्यातील सुमारे सत्तर हजार आशा स्वयंसेविका व ३५०० गटप्रवर्तक यांना लाभ होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असूनही संघटनेने केलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले आहे. असे असले तरी दरमहा मानधनासोबतच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आगामी काळात आंदोलनाची धार आणखीनच तीव्र करावी लागणार आहे.

म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी एकत्र येऊन संघटना भक्कम करणे गरजेचे आहे. भविष्यात संघटनेशिवाय पर्याय नाही.त्यामुळे सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आपल्या संघटनेचे सभासदत्व स्वीकारून संघटनेचे हात बळकट करावेत.असे आवाहन आम्ही करीत आहोत.बमायाताई परमेश्वर, रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे, एड. गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, सर्व संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button