कलेसाठी सर्जनशीलता आवश्यक आहे प्रा. वैभव मावळे
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल
येथील भुसावळ कला, विज्ञान व पू. ओ.ना हा टा वाणिज्य महाविद्यालय आणि महाविद्यालयातील इतिहास विभागाअंतर्गत भारतीय कलेचा इतिहास या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी हे उपस्थित होते.
तसेच व्यासपीठावर इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रफुल्ल इंगोले उपस्थित होते.स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर प्रा. वैभव मावले यांनी भारतीय कलेचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी भारतात प्राचीन काळापासून कला अस्तित्वात असून कलेचा उगम वेदां तुन झालेला आहे. तसेच पाचवा वेद म्हणजे नाट्यशास्त्र आहे असे नमूद केले. याबरोबरच चित्रकला, शिल्पकला ,नाट्यकला इत्यादी कलेचे प्रकार यावर प्रकाश टाकून कलेतून सर्जनशीलता निर्माण होते. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे सुप्त गुण असतात. त्या गुणांचा विकास कलेतून होत असतो. कले शिवाय आपण जीवन जगू शकत नाही. कला जीवनाचा अविभाज्य घटक आहे असे विचार त्यांनी मांडले.
त्यानंतर अध्यक्षीय समारोप करण्यात आला त्यात उपप्राचार्य डॉ. ए.डी. गोस्वामी यांनी कला म्हणजे मानवी मनाचा आविष्कार हे सांगून प्रत्येकाने आयुष्यात एक तरी कला जोपासली पाहिजे असे मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भूपेंद्र बानाईत यांनी केले.प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीपाद वाणी यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ . एम. व्ही.वायकोळे ,उपप्राचार्य डॉ. एस . व्ही. पाटील ,उपप्राचार्य डॉ. बी. एच . बऱ्हाटे ,उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रा. जे. पी. अडोकर, प्रा. डॉ. ललित तायडे, प्रा. एस. टी.धूम, प्रा. व्ही. ए. सोळुंके, प्रा. उज्जवला महाजन, प्रा. शीतल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमा साठी मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ. के. के. अहिरे, प्रा डॉ. जे एफ. पाटील, प्रा डॉ
पी. ए. अहिरे, तसेच मानव्य विद्या शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होेते.






