तू हिंदू की मुस्लिम..!सारा खान पुन्हा ट्रोल…
मुंबई बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अतरंगी रे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ह्या निमित्ताने सारा ने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
साराचा हा फोटो फिल्मफेअरने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत सारा महादेवाची पूजा करताना दिसते. साराचे हे सगळे फोटो शेअर करत ‘अतरंगी रे’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शना आधी सारा दिल्लीत महादेवाची पूजा करते असे कॅप्शन देण्यात आले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर सारा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
ह्या फोटोवरून नेटकऱ्यांनी सारावर टीकेची झोड उठवली आहे.तू हिंदु आहेस की मुस्लिम असा प्रश्न विचारला आहे. तर एकाने साराला धर्माची आठवण फक्त चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी येते आणि ती आपला धर्म विसरली आहे.
दरम्यान, सारा अली खानचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सारासोबत या चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुष दिसणार आहेत. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.






