sawada

सावदा येथे आ.चंद्रकांत पाटील यांचे निधीतुन जलकुंभ मंजुर

सावदा येथे आ.चंद्रकांत पाटील यांचे निधीतुन जलकुंभ मंजुर

राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगरसेंवकाच्या पाठपुराव्याला यश

युसूफ शाह

सावदा(प्रतीनिधी) सावदा येथे आमदार चंद्रकांत पाटील यांचे निधीतून सावदा येथे जलकुंभ मंजूर झाले आहे.सावदा नगरपरिषद जवळ ०.४५ एमएलडी क्षमतेचा एक जलकुंभ सन १ ९ ७१ रोजी बांधकाम केलेला असून त्यास सुमारे ४ ९ वर्षे होवून गेलं आहे.सदरील जलकुंभ आजरोजी खुपच जिर्ण झालेला असून त्याचे बांधकाम फारच जुने असल्याने पडत आहे . सदरील जलकुंभ दुरुस्त करूनही वापरात आणता येणार नसल्याने सावदा नगरपरिषदेने सर्व साधारण सभा ठराव क्रमांक ६२ दिनांक ३१/०७/२०२० नुसार सदरचा जलकुंभ पाडून नवीन बांधकाम करणेबाबतचा ठराव पारीत केलेला आहे .

सदरील जलकुंभ नवीन बांधकाम झाल्यास सावदा शहरातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.तसेच सदरील काम लोकाभिमुख असल्याने जलकुंभाचे काम त्वरीत हाती घेण्यात येवून पूर्णत्वास आणणे आवश्यक आहे.जलकुंभासाठी लागणारा निधी रक्कम रूपय ६५ लाख निधीची आवश्यकता असल्याने आपण आपले निधीतून वा इतर योजनेतील निधी प्राप्त करून दिल्यास जलकुंभाचे काम हाती घेता येईल अशा आशयाचे निवेदन सावदा येथील राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी आ.चंद्रकांत पाटील यांना दिले या वेळी मा.नगराध्यक्ष व विद्यमान राजेश गजानन वानखेडे, फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण , . सिध्दार्थ बडगे , किशोर बेंडाळे , सौ.विजया जावळे , नाराबी शेख इश्तीयाक बागवान , सौ.मिनाक्षी कोल्हे , सावदा विश्रामगृह येथे या बैठाकित नगरसेवाकंसः
एनसीपी शहरअध्यक्ष कुशल जावळे, एनसीपी विद्यार्थी तालुका अध्यक्ष साईराज वानखेडे यांचे ईतर मान्यवर तथा पत्रकार बांधव उपस्थित होते, तरी पालिका प्राशासने पुढील कार्यवाही गतीमान करावी अशीआशा व्यक्‍त केली जात आहे.

आमदार यांनी तत्काळ उपलब्ध करुन दिला निधी

या वेळी एक जलकुंभ जीर्ण झाल्यामुळे त्याचा वापर बंद करावा लागल्याने सावदा शहरातील सामान्य जनतेला पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत होते या प्रश्‍नाच्या उत्तरावर समाधान म्हणून दुसरा जलकुंभ तत्काळ उभा करणे परंतु पालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत सिमित असल्याचे मा.न नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यावर आमदार यांनी लागलीच निधी उपलब्ध करून दिला व सर्वसामान्य जनतेला पाणी प्रश्नाबाबत दिलासा मिळवून दिला म्हणून समाधान व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button