अंतुर्ली-रंजाणे ग्रुप ग्रामपंचायत बिनविरोध सरपंच व उपसरपंच पदग्रहण सोहळा संपन्न..
अमळनेर: दि.०४/०१/२०२३ रोजी अंतुर्ली रंजाणे ग्रुप ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी मंगलाबाई किशोर पाटील तर उपसरपंच पदी संजय नारायण सैंदाणे विराजमान झालेत.
अमळनेर तालुक्यातील चुरशीची वाटत असलेली अंतुर्ली रंजाणे ग्रुप ग्रामपंचायत तब्बल वीस वर्षांनी बिनविरोध झाली आहे. यात लोकनियुक्त सरपंचपदी मंगलाबाई किशोर पाटील विराजमान झाल्या आहेत. तर. उपसरपंच पदी संजय नारायण सैंदाणे विराजमान झाले. सदस्य पदासाठी बापू उत्तम ठाकूर, सीमा भरत पाटील, सागर मधुकर जगदेव, निशा राहुल पाटील, हेमांगी पवन पाटील उज्वला पिंटू भिल हे सदस्य बिनविरोध झाले आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले असून गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन जेष्ठ नागरिक व तरुण यांनी समेट घडवून आणला आहे. तसेच सर्व ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच व सदस्यांचे. अभिनंदन केले व पुढील कार्यकाळात शुभेच्छा दिल्या आहेत.







