Maharashtra

शेतकर्‍यांचे व साखर कारखानदारांचे हित जपण्यासाठी इस्माकडून प्रयत्न करणार अंकिता पाटील

शेतकर्‍यांचे व साखर कारखानदारांचे हित जपण्यासाठी इस्माकडून प्रयत्न करणार अंकिता पाटील

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे :आज ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर ची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग संपन्न.

कोरोना व्हायरसचा सर्व उद्योगांवर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे साखर उद्योगा समोर ही अनेक संकट उभे राहिले आहेत. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना व कारखानदारांना ही होत आहे. ह्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान यांनाऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन च्या वतीने कोणकोणत्या योजना राबवून गोरगरीब शेतकऱ्यांना व साखर कारखानदारांना दिलासा देता येईल. याबाबत बोर्ड ऑफ डायरेक्टर समवेत सर्वांनी चर्चा केली व शिफारस करण्यास संदर्भामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे निर्णय झाला, अशी माहिती ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी दिली.

भारतामध्ये सध्या लॉकडाउन असल्यामुळे वाहतुकी वरती व ऊस तोडणी वरती परिणाम झाला आहे. त्यामुळे साखर उत्पादनावर ती काहीशा फरक पडलेला आहे. पण देशात पुरेशी साखर आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जायचे कारण नाही. कोरोनाचा प्रसार आणि लॉकडाउनमुळे सुरुवातीला ट्रक उपलब्ध नसल्याने साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता, पण सरकारच्या हस्तक्षेपामुळे, गेल्या काही दिवसांत स्थिती सुधारली आहे. कुठे ऊस उपलब्ध असेल, तिथे शेतकर्‍यांना कसलीही बाधा येऊ नये, ऊस तोड कामगारांना , साखर कामगारांना कोरोणा मुळे कुठलीही बाधा होऊ नये त्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन काही ठिकाणी कारखाने सुरू आहेत, असे ही कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी सांगीतले.

कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझर चा वापर आवश्यक आहे. मात्र अचानक कोसळलेल्या संकटामुळे सदरची मागणी वाढून बाजारांमध्ये सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला होता. काही कंपन्यांनी बनावट उत्पादनात विक्रीस आणले त्यामुळे अजून धोका वाढला.

ह्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता आम्ही, ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या वतीने अभ्यास केला. त्यावेळी हे लक्षात आले की बहुतेक कारखान्यांकडे अल्कोहोल निर्मितीचे प्रकल्प असल्याने स्पिरीट चे उत्पादन मुबलक होते. 80 टक्के अल्कोहोल व 20 टक्के इतर घटक मिसळून सॅनिटायझर ची निर्मिती करता येते.

साखर उद्योगाकडे असलेल्या अल्कोहोल प्रकल्पांना सॅनिटायझर ची निर्मिती करण्यास शक्य असल्याने केंद्र सरकारची याबाबत चर्चा केली व साखर उद्योगासाठी सॅनिटायझर उत्पादन करण्यास तातडीने कशी परवानगी मिळेल त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला.

सध्या देशभरात अनेक साखर कारखाने त्यांनी सॅनिटायझर ची निर्मिती करत आहेत व या सॅनिटायझर ती गुणवत्ता बाकीच्या पेक्षा उत्तम आहे व त्याला व त्याचे मूल्य ही कमी आहे. अशी ही माहिती ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी यावेळी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button