अँग्लो उर्दू शाळेच्या माजी मुख्यध्यापक व लिपिक वर गुन्हा दाखल व्हावा! इत्तेहाद संस्थेचे सचिव,चेअरमन यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कडे तक्रार द्वारे केली मागणी
युसूफ शाह सावदा
सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील प्रसिद्ध शैक्षिक संस्था इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी व त्या द्वारा संचालीत अँग्लो उर्दू हायस्कुल सावदा चे माजी मुख्यध्यापक व आजी शिक्षक अली हैदर खान अजमल खान,माजी लिपिक शेख साबीर शेख सांडू या दोघांच्या विरोधात २ लाख रुपये चा शासकिय अपहार केल्याबाबत ठपका ठेवून संस्थाने फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत रितसर पुराव्यानिशी जिल्हा पोलिस अधीक्षक जळगाव व शिक्षण अधिकारी (माध्य) जि,प जळगांव कडे तक्रार केल्याने शैक्षिक क्षेत्रात व शहरात एकच खळबळ उडाली आहे
या बाबत सविस्तार वृत्त असे की , संस्थने शाळा रेकार्ड तपासणी केली असता माजी लिपीक व माजी मुख्यध्यापक अली हैदर यांचे कार्यकाळातले अनेक काम चुकिचे व अपूर्ण असून त्यात मोठय़ा प्रमाणांत अफरा तफर खोटेपणा आढळुन आले आहेत खर्च केलेली अनुदान रककम व बिलात तफावत असुन बिलानुसार शाळेत
साहित्य सुद्धा नाही
यात अधिक गंभीर असे की त्यांचे काळात नियमांची पायमल्ली करुन जाणीवपूर्वक रित्या शाळेच्या जनरल रजिष्टर मध्ये मनाप्रमाणे नावांमध्ये वाढवून नाव लिहले गेल्याची धक्कादायक बाब ही संस्था मंडळच्या समोर आली आहे
तसेच माजी मुख्यध्यापक व लिपिक यांनी त्यांचे कार्यकाळात मुलांना डायरेक्ट लि, स, दिले आहे व पास नापास या बात ची नोंद रितसर शाळेतील त्यावेळेला रजिस्टर न १ मध्ये केलेली नाही या बाबत संचालकांनी जाब विचारल्यानंतर उडवाउडवीची भाषावापरून परिणामी विदयार्थी मुलांचे भविष्य धोक्यात घालून चुकिचे केलेले कामाशी घाबरुन लिपिक शेख साबीर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन नोकरी सोडून दिलेली आहेत
सध्या संस्था विरोधी भुमीका घेणाऱ्या माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा पुर्वीपासून अतिशय जवळील व विश्वासु महणून ओळखले जाणारे सदरील अली हैदर खान याला त्यांचा आशिर्वाद छुपा पाठिंबा असल्यामुळेच आता संस्थेचे सचिव यांना तो दमदाटी करतो मागे अशेच त्यांनी धिंगाणा केला होता तसेच तो आॕनड्यूटी मद्य सेवन करुन शाळेत येतो शाळेत तंबाकू गुटखा खावुन शाळे येतो शाळेतुन रेकार्ड हेरफेर करणे, सर्व्हिस बुक गहाळ करणे इत्यादी गैर काम त्यांनी केले आहे तसेच सध्या मुख्यध्यापक यांना दमदाटी करणे इत्यादी गंभीर बाबीचा उल्लेख संस्थेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रात असून त्यावरील संस्थेचे सचिव शेख सुपडू शेख रशीद, चेअरमन शेख इकबाल शेख कादर सहीत ४ सदसयांचे सुद्धा सह्या असुन लवकरच पुराव्यानिशी या संदर्भात सावदा पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा ही दाखल केला जाईल अशी माहिती संस्थेचे जबाबदार संचालकांनी सदरील प्रसिद्धीपत्र देत्यावेळी दिलेली आहेत






