बोगस शिक्षक भरती प्रकरणी आरोपींच्या संख्येत त्या चौघांची वाढ- मात्र अद्याप कोणालाही अटक नाही!
(सावदा येथील प्रकार)
“जवळपास ३ महिनेपुर्ण होण्याच्या तोंडावर सदर गुन्ह्यात नवीन ४ जणांचे नाव वाढल्यामुळे आता एकूण आरोपी संख्या थेट १४ झाली.मात्र एकच संशयित संचालक शेख हनीफ शेख रशीद मंन्सुरी शिवाय इतर संशयित आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.याबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.”
—————————————-
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील ॲंग्लो उर्दू हायस्कूल ही शाळा बोगस शिक्षक भरती प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात दि.११ मे २०२२ रोजी दाखल गुन्हाच्या अनुषंगाने जिल्ह्यात भलतीच प्रकाशझोतात आलेली आहे.
या बोगस शिक्षक भरती प्रकरणी दाखल गुन्ह्यात तात्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी बि.जे पाटील व उपशिक्षणाधिकारी देवांग सहीत या शाळेची शैक्षणिक संस्था इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे संचालक शेख सुपडू शेख रशीद मंसुरी,शेख हनीफ शेख रशीद मंसुरी व (मयत)सगिर दगडू बागवान, मुक्तार अली कादर अली,लुकमान खान गुलशेर खान,शेख रफीक शेख गुलाब,व ३ शिक्षक असे एकूण ११ संशयितांचे नाव होते.मात्र या गुन्ह्यात संचालक शेख हनीफ शेख रशीद मंसुरी यालच अटक झाली असता तो एकटच जवळपास ३ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.परिणामी सदर गुन्ह्याची (चारसिट) दोषारोपपत्र दि.५ ऑगस्ट २०२२ रोजी रावेर कोर्टात दाखल झाले असून या गुन्ह्यातून उपशिक्षणधिकारी देवांग (पुर्ण नाव माहीत नाही) यांचे नाव कायद्याचे कलम १६९ अन्वये कमी झाल्याचे समजते.आणि संशयित आरोपी म्हणून जि.प.जळगांव मध्ये तात्कालीन उपशिक्षणधिकारी व सध्या चंद्रपूर येथील शिक्षणाधिकारी कल्पना दमडू चव्हाण,जि.प.कक्षाधिकारी किशोर विलास वानखेडे,चिंचोली येथील योगेश अशोक खोडपे सह ॲंग्लो उर्दू हायस्कूल या शाळेचे शाळा समिती चेअरमन तथा भुसावळ न.पा.उर्दू शाळेचे शिक्षक शेख इक्बाल शेख कादर मन्यार या ४ जणांच्या विरोधात पोलिस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.हे मात्र खरे आहे.






