अंबड कोव्हीड केअर सेंटर ऑक्सीजन प्लांट महापालिका कडे हस्तांतरित
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक=अंबड एम आय डी सी मध्ये टीडीके कंपनी वतीने कोवीड सेंटर येथे उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लाट हा पूर्णपणे कार्यान्वित झाला असून नासिक महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात आला आहे.नाशिक महानगरपालिकेचे मा.आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या कालावधी मध्ये नाशिक महानगरपालिका स्तरावरून विविध सामाजिक संस्था तसेच कंपन्यांना मनपास कोरोना उपचार कामी कोरोना विषयक लढाईत उपचार करणे कामी आवश्यक असणार्या बाबींची पूर्तता करणे बाबत आवाहन करण्यात आले होते. त्यास आईमा नाशिक यांच्या वतीने अंबड येथे ५०० खाटांचे रुग्णालय सीएसआर अंतर्गत सुरू करण्याबाबत मान्य करण्यात आले. यामध्ये टीडीके कंपनीतर्फे हवेतून ऑक्सीजन जनरेट करण्याचा पीएसए प्लांट या ठिकाणी स्थापना करण्यात आलेला आहे.या प्लांट मुळे १०० खाटांना ऑक्सिजन पुरवठा होणार असून ऑक्सीजन तुटवडा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात आलेली आहे. सदरचा ऑक्सीजन प्लांट हा पूर्णपणे कार्यान्वित केलेला असून टीडीके कंपनीतर्फे नासिक महानगरपालिकेकडे आज रोजी हस्तांतरण करण्यात आला. यावेळेस नाशिक महानगरपालिकेचे मा.आयुक्त श्री कैलास जाधव यांच्या हस्ते फित कापून उदघाटन झाले. सदर प्लांट बाबत संपूर्ण माहिती मा.आयुक्त कैलास जाधव यांनी जाणून घेतली. त्यावेळी यासर्व प्रकल्पाची माहिती घेऊन कामांची पाहणी केली व विविध कामाच्या सूचना केल्या
या कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेचे मा.आयुक्त कैलास जाधव, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे,या जंबो कोविड सेंटर चे मुख्य समन्वयक व आयमाचे चेअरमन धनंजय बेळे,एमआयडीसीचे विभागीय अधिकारी नितीन गवळी, आयमा चे उपाध्यक्ष निखिल पांचाळ, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, शहर अभियंता नितीन वंजारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत शेटे बायोमेडिकल इंजिनियर ऐश्वर्या म्हात्रे-कुलकर्णी तसेच बांधकाम विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टीडीके कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री हरिशंकर बॅनर्जी व श्री बी.एस.रे, बॉश कंपनीचे विजय भट,व नाशिक रन चे अशोक कासार हे कार्यक्रमास उपस्थित होते.






