India

Amazing: तुम्ही मोबाईल कसा धरतात यावरून समजू शकतो तुमचे व्यक्तिमत्व…

Amazing: तुम्ही मोबाईल कसा धरतात यावरून समजू शकतो तुमचे व्यक्तिमत्व…
मानसशास्त्रानुसार, व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येतो. यामध्ये एखादी व्यक्ती मोबाईल फोन कसा चालवते, यावरून तुम्ही त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही जाणून घेऊ शकता. फोन ठेवण्याची शैली एखाद्या व्यक्तीचे वर्तन आणि त्याचे जीवन कसे जगते हे प्रतिबिंबित करते. तुम्ही ज्या पद्धतीने फोन धरता, त्यावरून तुमचे व्यक्तिमत्त्व कोणत्या प्रकारचे आहे, ते समजू शकते. आजच्या लेखात आपण दिल्लीचे ज्योतिषी आचार्य पंडित आलोक पंड्या यांच्याकडून जाणून घेणार आहोत की, एखाद्या व्यक्तीची फोन हातात धरण्याची पद्धत काय सांगते.

फोन एका हाताने धरण्याची सवय –

फोन एका हाताने धरून स्क्रीन ऑपरेट करण्यासाठी त्याच हाताचा अंगठा वापरण्यात तुम्हाला सोयीस्कर वाटत असल्यास, तुम्ही एक निश्चिंत आणि आनंदी व्यक्ती आहात. तसेच तुमच्यात खूप आत्मविश्वास आहे. असे लोक जे एका हाताने फोन चालवतात, त्यांच्या आयुष्याविषयी फारश्या तक्रारी नसतात. निसर्ग नियम आणि आपल्या कर्मानुसार जे काही मिळते ते ते सहज स्वीकारतात. अशा लोकांचा स्वतःवर विश्वास असतो आणि हा गुण त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतो. या लोकांना धोका पत्करून काम कसं करायचं, हे देखील चांगलं माहीत आहे. ते त्यांचे ध्येय, उद्दिष्टे आणि इच्छा साध्य करण्यासाठी त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू शकतात.

दोन्ही हातांनी मोबाइल वापरणारे –

जर एखादी व्यक्ती मोबाईल फोन ऑपरेट करण्यासाठी त्याचे दोन्ही हात वापरत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, तो एक बुद्धिमान आणि व्यावहारिक व्यक्ती आहे. अशा लोकांना इतरांबद्दल सहानुभूती असते आणि ते लगेच इतरांच्या बोलण्यात गुंतून जातात. असे लोक त्यांच्या आयुष्यात जास्त संधी घेत नाहीत आणि जास्त पैसे मिळवण्याऐवजी सावध राहणे पसंत करतात.

दोन्ही अंगठ्यांचा वापर करणारे –

मोबाईल दोन्ही हातांनी धरून तो ऑपरेट करण्यासाठी दोन्ही अंगठे वापरत असाल, तर तुमच्याबद्दल असे म्हणता येईल की, तुम्ही परिस्थितीचे विश्लेषण करण्यात माहीर आहात. आव्हान काहीही असले तरी त्यावर तुम्ही योग्य उपाय शोधू शकता. गोष्टींना विरोध करण्याऐवजी तुम्ही त्या योग्य पद्धतीने सोडवण्याचा/ करण्याचा आग्रह धरता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button