Amazing: नाग खरंच दूध पितो का…?
प्रत्येक हिंदू नागपंचमीच्या दिवशी नाग देवाची पूजा-अर्चना करतो. अनेक लोकांचा अंधविश्वास आहे की नागाला दूध पाजण्याने नाग देव प्रसन्न होतात. परंतू हा गैरसमज आहे कारण नाग कधीच दूध पीत नाही. दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही. नाग दूधच काय कोणताही पेय पदार्थ पीत नाही. चुकीने दूध प्यायला तर त्याची मृत्यू होऊ शकते. मग अशात पूजा काय कामाची? अशाने फल मिळण्याऐवजी मृत्यूचा दोष लागू शकतो.
किंग कोब्रा हा जगातील सर्वांत खतरनाक सापांपैकी एक मानला जातो. भारतामध्ये नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. वारूळावर जाऊन नागाला दूध पाजण्याची प्रथा आपल्याला माहिती असेल. तर नागाबद्दल अनेक अफवा सुद्धा पसरलेल्या आहेत. पण साप खरच दूध पितो का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. दरम्यान, Crazy XYZ या युट्यूब चॅनेलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यामध्ये थेट नागाबरोबर प्रात्यक्षिक करून यासंबंधी सत्यता पडताळण्यात आली आहे. साप दूध पितो का? मिठाने केलेल्या रिंगणातून साप बाहेर पडतो का? या प्रश्नांची उत्तरे यामधून मिळणार आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाळलेल्या सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न केला जातो पण साप दूध पित नसल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर काही वेळाने त्याच्यासमोर पाण्याची वाटी ठेवली जाते. त्यानंतर नाग पाणी पिताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावरून नाद दूध पित नसल्याचा दावा यातून केला जात आहे. काही वेळाने दोन नागाला जंगलात नेऊन मिठाने केलेल्या रिंगणामध्ये सोडण्यात येते पण काही क्षणात या रिंगणामधूनही नाग निघून जाताना दिसत आहेत. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर नागाला दूध पाजण्याचाही प्रयत्न करू नये. नागाला त्रास झाल्यास तो आपल्यावर हल्ला करण्याची दाट शक्यता असते त्यामुळे काळजी घेतली पाहिजे.
Related