Amalner

Amalner: मुलीला भेटायला गेले आणि घरात… अरे बापरे!

Amalner: मुलीला भेटायला गेले आणि घरात… अरे बापरे!

अमळनेर शहरातील शास्त्री नगर भागात दाम्पत्य मुलीकडे गेले असता त्यांच्या घरी चोरट्यानी चोरी केल्याची घटना घडली असून यात चोरट्यांनी ३२ हजार ५०० रु ऐवज चोरून नेला आहे.याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, शहरातील शास्त्री नगर ढेकु रोड परिसरातील हरीचंद्र वाडेकर व प्रमिला वाडेकर हे दि १८जून रोजी त्यांची मुलगी सुनीता खैरनार रा मुंदडा नगर यांना भेटायला घराला कुलुप लावून गेले होते. १९ जून रोजी सकाळी ७ वाजता हरीचंद्र वाडेकर सकाळी घरी परत आले असतांना त्यांना घराचे कडी-कोंडा तुटलेला आढळला. कपाट तोडून १२ हजार रु ७ ग्रॅमची सोन्याची चैन,७ हजार रु ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, २ हजार रु किंमतीचे १ ग्रॅम चे कानातील दागिने,१ हजार ५०० रु चांदीचे ब्रेसलेट, १० हजार रु रोख असे एकूण ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञाताने घरफोडून चोरून नेला आहे.अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. बापू साळुंखे करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button