Amalner: जैतपिर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त…
अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मारवड
पोलिसांनी पकडत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर सव्वा ब्रास वाळू असा ४ लाख ५२ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबद्दल सविस्तर अधिक माहिती अशी की, दि ९ रोजी पहाटे साडे चार वाजता
जैतपिर गावात जि. प. शाळेजवळ वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर रात्रीची गस्त घालत असताना मारवड पोलिसांना सापडले.स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व सव्वा ब्रास वाळू असा ४ लाख ५२ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सचिन निकम हे करित आहेत.






