अमळनेर: गोवर्धन शिवारातून गुरांची चोरी..!
अमळनेर मारवड हद्दीतील गोवर्धन शिवरातून गुरे चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मारवड येथील रहिवासी संभाजी बुधा पाटील यांनी गुरे माळण नदीच्या काठी गोवर्धन शिवारात १६ नोव्हेंबर
गुरे खळ्यात बांधली होती. १७ नोव्हेंबर ला सकाळी गायीचे दूध काढण्यासाठी गेले असता खळ्याचा लाकडी व जाळीचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी एक गाय, एक गोऱ्हा,एक बैल असे गुरे आढळून आले नाही.
सदर गुरांची किंमत गाय २० हजार रु, गोऱ्हा ५ हजार रु, व बैल २० हजार रु असे जवळपास 55 हजार रु गुरे चोरीस गेले तर दुसऱ्या घटनेत ज्ञानेश्वर एकनाथ बडगुजर यांच्या मालकीचा रेडा १० हजार रु, मुरलीधर सीताराम पाटील यांच्या मालकीचा गोऱ्हा १० हजार रु , 2 वासऱ्या ३५ हजार रु अशी एकूण एक लाखाची गुरे अज्ञात चोरट्याने मारवड डांगरी रस्त्यावरून गोवर्धन शिवरातून चोरून नेल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात मारवड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






