अमळनेर:चोऱ्यांचे सत्र थांबेना..! मॉर्निंग वॉक पडला महागात..! महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने केले लंपास..!
अमळनेर येथे सातत्याने चोऱ्या होत आहेत. चोरीचे वेगवेगळे प्रकार उपयोगात आणले जात आहेत.गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या देखील चोऱ्या होत आहेत. घरा समोरच्या गाड्या देखील चोर सोडत नाही. आणि आता तर सकाळचा मॉर्निग वॉक देखील सुरक्षित राहिलेला नाही.मॉर्निंग वॉक ला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 15 ग्राम वजनाची 45 हजार रु किंमतीचे मंगळसूत्र चोराने चोरून नेल्याची घटना 25 डिसेंबर रोजी सकाळी साडे पाच वाजता विजय शॉपीच्या मागे घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदूबाई तानिराम बडगुजर रोजप्रमाणे सकाळी साडे पाच वाचता मॉर्निंग वॉक ला गेली होती. हॉटेल सम्राट जवळ विजय शॉपीच्या मागे एक काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला 25 ते 30 वयाचा तरूणाने मागच्या बाजूने येऊन महिलेच्या अंगावरील शाल ओढली आणि गळ्यातील 15 ग्राम वजनाचे 45 हजार रु किंमतीचे मंगळसूत्र चोरले.सदर इंदूबाई बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करत आहे.






