Amalner: प्रवासी का बसवले म्हणून रिक्षाचालकास मारहाण..!
अमळनेर रेल्वे स्टेशन वरून प्रवासी का बसवले, या कारणावरून चौघांनी एक रिक्षा चालकाला प्रवेशद्वारावरच मारहाण केल्याची घटना २१ रोजी दुपारी दीड वाजता घडली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, लक्ष्मण प्रकाश पाटील रा गणेश कॉलनी , तांबेपुरा हे रिक्षा क्रं एम एच १८ एन ६७०० दि २१ रोजी चार प्रवासी घेऊन रेल्वे स्टेश वर गेले होते. यावेळी दोन प्रवासी उतरवून प्रवेशद्वाराजवळ गेला असता दीपक (पूर्ण नाव माहीत नाही), पप्पू (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यासह अनोळखी दोघांनी त्याला मधून प्रवासी का बसवले असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी लक्ष्मणला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पो ना सुनील हटकर यांनी दवाखान्यात जाऊन जबाब नोंदवला व चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे कॉ बापू साळुंखे करीत आहे.






