Amalner: समता शिक्षक परिषद अमळनेरची सभा वैचारिक मंथनाने संपन्न!
अमळनेर, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव शाखेतर्फे केलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका संदर्भात दि.११सप्टेंबर रोजी अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयातील यशवंत हाॅलमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान व विचार विनिमयासाठी सभा संपन्न झाली.
समता शिक्षक परिषद ही गुणवत्तेला प्राध्यान्य देणारी संस्था आहे. इंग्रजी विषयाचा जिल्ह्यात मूलभूत मांडणी करणारी ही अप्रतिम संस्था. उत्कृष्ट टीम वर्क करणारी समता शिक्षक परिषद संघटना शैक्षणिक व सामाजिक प्रश्न सोडविण्याचे काम सातत्याने करीत आली आहे.अशा ह्या संस्थेच्या अमळनेर तालुक्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षक परिषदेची कार्यकारणीची निवड व विचारविनिमय करून पुढील वाटचालीची दिशा ठरविण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थान कैलास पाटील (अध्यक्ष -खाजगी प्राथ.शिक्षक पतपेढी, जळगाव) यांनी भूषविले.
सभेचे सूत्रसंचालन बापूराव पाटील( ठाकरे सर)यांनी केले. विचारमंचावर माध्यमिक जिल्हा कार्यकारणीचे वरिष्ठ पदाधिकारी श्री सोपान भवरे तर प्राथमिक संघटनेचे पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अजय भामरे उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांचे सत्कार झाले. त्यानंतर निवड झालेल्या सभासदांचा परिचय करून निवडीबाबत यथोचित सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात श्री सोपान भवरे सरांनी समता म्हणजे काय? समता परिषद काय कामे करते? संस्थेची कार्यपद्धती तसेच अशा संघटनेचे महत्व का आहे? यावर सविस्तर विचार मांडले.यानंतर श्री अजय भामरे सरांनी शिक्षक परिषदेने गुणवत्ता निर्माण करणाऱ्या शिक्षकांसाठी पुरस्कार कसे दिले जातात याबाबत माहिती दिली.समता शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष मा. भरत शिरसाठ सरांनी ऑनलाईन उदबोधन करून समता परिषदेची वाटचाल कशी होत आली. त्याचप्रमाणे समता परिषदेत कार्यकर्त्यांचे निकष काय असतात ते सांगितले.
सभेचे अध्यक्ष श्री कैलास पाटील यांनी पारदर्शक संघटना म्हणून शिक्षक परिषदेचे काम सर्वोत्तम आहे असे मत मांडून काही लुबाडणाऱ्या संघटनेचे उदाहरण दिले.
याप्रसंगी प्राथमिकचे तालुकाध्यक्ष बापूराव पाटील ( ठाकरे सर) सचिव अनंतकुमार सुर्यवंशी,उपाध्यक्ष अशोक पाटील,महिला उपाध्यक्ष श्रीम.अर्चना वाघ,दिनेश मोरे,चतुर पाटील, उज्ज्वल मार्कंडेय, किरण मोहिते, माध्यमिक चे सचिव रामेश्वर पवार ,उपाध्यक्ष हनुमंत पाटील, चंद्रशेखर ठाकूर,दिपक पाटील,अतुल बोरसे, जितेंद्र बेडसे आदि पदाधिकारी व शिक्षक, शिक्षिका सभेसाठी उपस्थित होत्या.आभारप्रदर्शन अशोक पाटील सरांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज बिऱ्हाडे, दत्ता सोनवणे, योगेश पाने, दिनेश मोरे यांनी प्रयत्न केले.






