Amalner

Amalner:तहसिलदार आणि लोकप्रतिनिधींनी अतिवृष्टी चे पंचनामे करावेत व मागील अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा..शेतकऱ्यांची मागणी

Amalner:तहसिलदार आणि लोकप्रतिनिधींनी अतिवृष्टी चे पंचनामे करावेत व मागील अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा..शेतकऱ्यांची मागणी

अमळनेर 2021 खरीप मध्ये सुरवातीला पाऊस नसल्याने तीबार पेरणी व नंतर ऑगस्ट,सप्टेंबर वऑक्टोंबर मध्ये झालेली अतिवृष्टी चे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला होता त्यांना नुकसान भरपाई मिळाली पण ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला नाही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
त्या बाबतीत जळगाव जिल्ह्याचा समावेश पण झाला आहे तरी अद्याप पावेतो अनुदान मिळाले नाही त्या साठी पण प्रयत्न करावा ही विनंती.

24 तासात 65 मी.मी. पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हणतात.भलेही तो पाऊस दीड ते दोन तासात झाला असला तरीही आणि त्यावर नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे.

आणि दरवर्षी पीक पक्व होणाऱ्या कालावधीत मुग, उडीद पिकासाठी साधारण 25 ऑगस्ट ते 10सप्टेंबर तीळ,सोयाबीन,बाजरी कापूस, मका, ज्वारी या पिकासाठी 10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत पाच दहा दिवस सतत पाऊस पडतो तरी 65 मी.मी.होत नाही पण नुकसान मात्र 70 ते 75 टक्के होते.त्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी म्हणून तरतूद करण्यात यावी यासाठी
म.आमदार सो यांनी विधान सभेत प्रश्न उपस्थित करून लक्षवेधी मांडवी ही विनंती
तो पर्यंत त्यांनी तहसील दार मार्फत महसूल व कृषी विभागाच्या वतीने संयुक्त पंचनामे करण्याचे कळवावे ही नम्र विनंती.अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button