Amalner: जी.एस.हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा
अमळनेर शहरातील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूल येथे विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनी स्वयंशासन दिन साजरा केला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत वर्गात अध्ययन केले.काही विद्यार्थ्यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जबाबदारी पार पाडली.विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक दिनी वेगळा उत्साह पहायला मिळाला. एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यावेळी विद्यार्थी संघाकडून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून शिक्षकांचे आपल्या आयुष्यातील महत्व विषद केले. उपशिक्षक राहुल.जे.पाटील यांनी सर्वपल्ली राधाकृष्णण यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला.
शाळेचे मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व,तत्वज्ञान याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक आर.एल.माळी,बी.एस.पाटील जेष्ठ शिक्षक एस.बी.निकम, ए.डी.भदाणे,एस.आर.शिंगाणे,सी. एस.सोनजे उपस्थित होते.
विद्यार्थी संघाचे प्रमुख उपशिक्षक एस.आर.अहिरे,एस.ए.बनसोडे यांनी यशस्वी नियोजन केले.सूत्रसंचालन एस.आर.अहिरे यांनी केले तर आभार आर.जे.पाटील यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते






