Amalner: खान्देशचे लोकप्रिय खासदार श्री उन्मेश दादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश..धरणगाव -टाकरखेडा- अमळनेर रस्त्यावरील रेल्वे गेट नं -137,पूल नं- 324 जवळील खराब रस्ता तात्काळ दुरुस्तीचे आदेश..
धरणगाव- टाकरखेडा- अमळनेर जाण्यासाठी रस्त्यावरील रेल्वे गेट नंबर 137 जवळील व पुलाखालील रस्ता अत्यंत खराब झाला होता तसेच तिथे बऱ्याच दुर्घटनाही होत होत्या, टाकरखेडा धरणगाव अमळनेर तसेच तमाम नागरिकांच्या या रस्त्याविषयी समस्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्याकडे आल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही याबाबत खान्देशचे लोकप्रिय खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याशी संपर्क साधून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा पावसाळ्यात नागरिकांचे खूप हाल होतील तसेच खराब रस्त्याचे फोटोग्राफ देऊन कैफियत मांडली,तात्काळ खासदार साहेब यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी वार्तालाप केला व यासंदर्भाचे पत्र डी आर एम साहेब वेस्टन रेल्वे मुंबई, तसेच सहाय्यक अभियंता अमळनेर यांच्याकडे दिले.
तात्काळ खासदार साहेब यांच्या पत्राची डी आर एम व सहायक अभियंता यांनी दखल घेत 15 ते 20 जून दरम्यान रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिलेले आहेत
याविषयी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी अमळनेर स्टेशन सल्लागार समितीचे सर्व सदस्य व नविद मेंबर यांनी व खान्देशातील तमाम जनता यांनी लोकप्रिय खासदार श्री उन्मेष दादा पाटील यांचे आभार मानले.






