Amalner: राष्ट्रवादी ग्रंथालय विभागातर्फे राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर १६ जून रोजी.. तब्बल १४ वर्षांनी खा शरद पवार अमळनेरला येणार..
अमळनेर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय आपणास विनंती करण्यात येते की राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्यस्तरीय शिबिर शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी जळगाव जिल्ह्य़ातील अमळनेर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी 8:00 वा पासून आयोजित करण्यात येत आहे. तरी
सदर शिबीराला आदरणीय खा शरदचंद्रजी पवार साहेब, मा. जयवंतराव पाटील साहेब, मा.अजित दादा पवार साहेब, विरोधीपक्ष नेते* , इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या राज्यव्यापी शिबाराच्या आयोजन ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.उमेश दादासाहेब पाटील तसेच ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक सौ.रिताताई बाविस्कर यांनी केलेली असून आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब अमळनेर तालुक्यात तब्बल २००९ साली आले होते.तब्बल १४ वर्षांनी खा शरद पवार हे अमळनेर ला येत आहेत त्यामुळे त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात होणार असल्याचे सौ. रिता भुपेंद्र बाविस्कर,महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिति सदस्य,प्रदेश समन्वयक ग्रंथालय विभाग,महिला प्रदेश सचिव,सचालक पातोंडा वि.का.सो यांनी सांगितले आहे.

.






