Amalner

Amalner: सीमेवर लढणारे सैनिक देखील बजावतील इटीबीपीएस मतपत्रिके द्वारे मतदानाचा हक्क…!

Amalner: सीमेवर लढणारे सैनिक देखील बजावतील इटीबीपीएस मतपत्रिके द्वारे मतदानाचा हक्क…!

अमळनेर : विधानसभा मतदार संघातील देशाच्या सेवेत असलेल्या सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदान नियमावली नुसार सीमेवरील देश सेवेत असलेले सैनिक इटीबीपीएस मतदान प्रक्रिये द्वारे मतदानाचा हक्क बजावतील.अमळनेर मतदार संघातील विधानसभा निवडणुकीत ९८४ सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी इलेक्ट्रॉनिक्स ( इटीपीबीएस) मतपत्रिका पाठवण्यात आल्याची व शुक्रवार पासून 85वर्षांवरील व दिव्यांग मतदारांसाठी होम वोटिंग सुरू करण्यात आले आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली. यासाठी 10 पथके नेमली असून मतदारांच्या सोयीनुसार व वेळेनुसार मतदान घेतले जाईल असे ही त्यांनी सांगीतले आहे.

देशसेवेतील सैनिक आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या कुटुंबियांना मतदान करता यावे यासाठी त्यांच्या कार्यालयात इलेक्ट्रॉनिक्स मतपत्रिका पाठवण्यात येतात. सैन्यदलाच्या मुख्य कार्यालयात पाठवल्यानंतर मतपत्रिका डाउनलोड करून घेतल्या जातात. त्यासोबत संबंधित सैनिकाला संदेश पाठवले जातात. त्यानंतर कार्यालय प्रमुखांच्या मदतीने त्या इलेक्ट्रॉनिक मतपत्रिकेची प्रिंट काढून संबंधित कर्मचार्यांकडून ओटीपी मागवून मतदान केले जाते. आणि त्या मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागवल्या जातात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button