Amalner

Amalner: दारू दिली नाही म्हणून “शाहरुख”, “सुलतान” चा बियर बार मध्ये राडा….

Amalner: दारू दिली नाही म्हणून “शाहरुख” चा बियर बार मध्ये धिंगाणा….

अमळनेर शहरातील जनता बियर बार मध्ये दारू दिली नाही म्हणून सुलतान व शाहरुख या दोन्ही भावांनी राडा घालत दुकानाचे नुकसान करून मालकाचे पैसे हातातील कडे काढून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, जनता बियर बार , बाजारपेठ येथे सुलतान रहिमखा पठाण,रा. शाहआलम नगर हे दारूपिण्यासाठी गेले होते. त्यांनी दारूची बाटली मागितल्यावर मालकाने तू येथे दारू पिऊ नको, पिल्यावर तू पैसे देत नाही आणि काचेचे ग्लास फोडून नुकसान करतो असे सांगितले. याचा राग सुलतानला आला आणि त्याने शिवीगाळ,दमदाटी करायला सुरूवात केली. लगेच त्याचा भाऊ शाहरुख रहिमखान पठाण याला फोन लावून बोलावून घेतले. दोघांनी बार मालकाला तोंडावर, छातीवर लाथा बुक्यांनी मारहाण केली. सुलतानने मालकाचा गळा दाबून तोंडावर बुक्का मारल्यामुळे त्यांचा चष्मा तुटला. त्याच्या खिश्यातून पैसे काढून,हातातील कडे काढून घेतले.
भांडण आवरण्यासाठी आलेल्या आजूबाजूच्या दुकानदारांना देखील दमबाजी केली. मालकाच्या फिर्यादीवरून दोन्ही भावांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button