Amalner: शेतात कपाशी पहायला गेला आणि विजेचा शॉक लागून मृत्यु पावला…
अमळनेर शेतात कपाशी पाहण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आमोदे येथे घडली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, कैलास भालेराव पाटील (वय 36) याच्या कडे 2 बिघे शेती असून शेतात कपाशी लागवड केली आहे, कपाशी पाहण्यासाठी ते शेतात गेले असता शेतातील विद्युत खांब्याच्या ताण दिलेल्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.त्या तारेत विद्युत करंट उतरला होता.त्याचा चुलत भाऊ शेतात गेले असता सदर प्रकार उघडकीस आला. जितेंद्र अमृत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कैलास पाटील यांच्या पश्चात दोन लहान मुले, पत्नी असा परिवार आहे, वीज वितरण कंपनी च्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवल्याने त्यांच्या गुन्हा दाखल करून शेतकऱ्याच्या परिवाराला आर्थिक मदत करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.






