Amalner

Amalner: साने गुरुजी माध्य शाळेचे उपशिक्षक समाधान पाटील यांची एनसीसी च्या सेना अधिकारी म्हणून नियुक्ती…

Amalner: साने गुरुजी माध्य शाळेचे उपशिक्षक समाधान पाटील यांची एनसीसी च्या सेना अधिकारी म्हणून नियुक्ती…

अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक समाधान पाटील यांची छात्र
सेना अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

समाधान पाटील यांनी नुकतेच नागपूर येथील ऑफिसर ट्रेनिंग
अकॅडमी येथे 45 दिवसाचे आर्मी प्रशिक्षण पूर्ण केले.या प्रशिक्षणात देशभरातून 517 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला. त्यांची साने गुरुजी विद्यालयात NCC अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. त्यांना 49 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पिनाकी बनिक यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील , संदीप घोरपडे, संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, मुंदडा नगर एक व सोनार नगर येथील सर्व रहिवासी व दुनियादारी ग्रुपचे सदस्य यांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button